मुंबई, पुणे आणि सोलापूरकरांसाठी खूशखबर, 20 डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस धावणार, मुहूर्त कधी?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Vande Bharat Express: मुंबई, पुणे आणि सोलापूरकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता या मार्गावर 20 डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे.
पुणे : वंदे भारत एक्सप्रेसमुळे रेल्वे प्रवाशांना जलद व आरामदायी प्रवासाची सुविधा मिळत आहे. आता मुंबई, पुणे आणि सोलापूरच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे बोर्डाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सोलापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचे डबे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या मार्गावर 16 डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे.
मुंबई ते सोलापूर या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मुंबईसह पुणे, दौंड, कुर्डूवाडी आणि सोलापूर ही महत्त्वाची ठिकाणी हे या मार्गावर आहेत. त्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेसचे डबे वाढवण्याची मागणी होत होती. त्यानुसार रेल्वे बोर्डाने प्रवाशांसाठी मोठा निर्णय घेतला असून लवकरच या मार्गावर 20 डब्यांची वंदे भारत ट्रेन धावणार आहे.
advertisement
अंमलबजावणी कधी?
राज्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते सोलापूर आणि सीएसएमटी ते शिर्डी या दोन वंदे भारत एक्सप्रेस एकाच दिवशी सुरू झाल्या आहेत. सीएसएमटी ते सोलापूर ही गाडी पुणे मार्गे धावत असून या गाडीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. आता ऑगस्ट महिन्यापासून या मार्गावर 20 वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे. केंद्रीय रेल्वे बोर्डाने याबाबत निर्णय नुकताच जाहीर केला आहे. त्यानुसार 28 ऑगस्ट 2025 पासून मुंबई – सोलापूर मार्गावर 20 डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे.
advertisement
प्रवाशांना फायदा
रेल्वे बोर्डाच्या वंदे भारत एक्स्प्रेसचे डबे वाढवण्याच्या या निर्णयामुळे सोलापूर ते मुंबई आणि मुंबई ते सोलापूर हा प्रवास वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. तसेच सोलापूरसह पुणे, कुर्डूवाडी, दौंड आणि मुंबईकरांना देखील या निर्णयाचा फायदा होणार आहे.
दरम्यान, राज्यात सध्या मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, नागपूर ते बिलासपुर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या 11 मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
July 27, 2025 2:50 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
मुंबई, पुणे आणि सोलापूरकरांसाठी खूशखबर, 20 डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस धावणार, मुहूर्त कधी?