सावधान! सोशल मीडियावरील 'ती' पोस्ट पडली महागात; तिघांची थेट येरवडा कारागृहात रवानगी

Last Updated:

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील देऊळगावराजे परिसरात सोशल मीडिया पोस्टमुळे तिघांवर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे

तिघांची थेट येरवडा कारागृहात रवानगी  (AI Image)
तिघांची थेट येरवडा कारागृहात रवानगी (AI Image)
पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील देऊळगावराजे परिसरात सोशल मीडिया पोस्टमुळे तिघांवर कारवाई झाली आहे. पोस्टद्वारे समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन युवकांवर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट टाकून दोन समाजात द्वेष पसरवल्याप्रकरणी या तिघांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
अटकेत असलेले आरोपी खुशीलाल सहाणी (वय २१), राजेश सहाणी (वय ३५, दोन्ही रा. उत्तर प्रदेश) आणि मीर हसन अली (वय २८, रा. बिहार) यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावरून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला होता. या पोस्टमुळे दोन समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. दौंड पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत आरोपींना बेड्या ठोकल्या.
advertisement
दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पोस्टमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता. मात्र, दौंड पोलिसांनी वेळीच सतर्कतेचे पाऊल उचलले. समाजात शांतता आणि सलोखा टिकून राहावा यासाठी आरोपींना विशेष कार्यकारी दंडाधिकारी आणि बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक यांच्यासमोर हजर करण्यात आले.
न्यायालयाने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तिन्ही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानुसार त्यांची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
advertisement
सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट करताना ती कायदेशीर चौकटीत असावी, कुणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अफवा पसरवणाऱ्या किंवा आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही पोलिसांनी दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
सावधान! सोशल मीडियावरील 'ती' पोस्ट पडली महागात; तिघांची थेट येरवडा कारागृहात रवानगी
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement