अजित पवार आणि महेश लांडगेंच्या वादात देवेंद्र फडणवीसांची उडी,विकासावरून दादांना चिमटे काढले

Last Updated:

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार महेश लांडगे यांना मोलाचा सल्ला दिला.

News18
News18
मुंबई : मुंबईनंतर राज्याचं लक्ष पुण्यातील दोन्ही महापालिकांकडे लागलं असून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपला लक्ष्य करत आपला भूमिका दाखवून दिली. त्यानंतर भाजप नेत्यांनीही अजित पवारांना इशारा दिला आहे. मात्र, पिंपरी चिंचवडम महापालिका निवडणुकीतील प्रचारात येथील भाजप आमदार महेश लांडगे आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यातील वाद काही केल्या कमी होताना दिसून येत नाही.अखेर या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार महेश लांडगे यांना मोलाचा सल्ला दिला. इथले विरोधक वैतागले आहेत,म्हणूनच ते अशा पद्धतीने बोलत आहेत. आपण आपलं काम शांतपणे करत राहावं,ते रागावले म्हणून आपण रागावू नये, असा सल्ला त्यांनी महेश लांडगे यांना दिला.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपण पिंपरी चिंचवडमध्ये इतकं मोठ्या प्रमाणात काम केलं आहे ते काम जरी आपण सांगितलं तरी कुणाला बोलता येणार नाही. ज्याप्रकारे मागच्या निवडणुकीत पिंपरी चिंचवडने आपल्या मतदान केलं, त्यापेक्षा जास्त जागा या महापालिका निवडणुकीत निवडून येतील.
advertisement

धमकी देणाऱ्यांनाही मुख्यमंत्री फडणवीसांनी कडक शब्दांत इशारा

दरम्यान एस.आर.ए प्रकल्पात धमकी देणाऱ्यांनाही मुख्यमंत्री फडणवीसांनी कडक शब्दांत इशारा दिला.
धमकी देणाऱ्याला त्याची जागा दाखवायला पिंपरी-चिंचवड पोलीस पूर्णपणे सक्षम आहेत,असं सांगत १६ तारखेनंतर या प्रकरणात स्वतः लक्ष घालणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
अजित पवार आणि महेश लांडगेंच्या वादात देवेंद्र फडणवीसांची उडी,विकासावरून दादांना चिमटे काढले
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement