पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीचा फडणवीस विरुद्ध पवार पॅटर्न, महायुतीत स्वबळाची ठिणगी

Last Updated:

2017 प्रमाणेच पिंपरी चिंचवड महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी भाजपने स्वबळाचा नारा देत नवा डाव टाकल्याचं बोलले जात आहे.

News18
News18
पुणे :  आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, पिंपरी चिंचवड शहरात भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट बघायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण दोन्ही पक्षातील नेत्यांनी स्वबळाची भाषा करत दंड थोपटले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड मध्ये आत्तापासूनच फूट पडण्यास सुरूवात झाली आहे. दुसरीकडे अजित पवारांना दूर ठेवण्यासाठी  2017 प्रमाणेच पिंपरी चिंचवड महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी भाजपने स्वबळाचा नारा देत नवा डाव टाकल्याचं बोलले जात आहे.

पिंपरी चिंचवडमधील पक्षीय बलाबल (2017 च्या  निवडणुकीत) 

advertisement
  • भारतीय जनता पक्षाला 77
  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 36
  • शिवसेना 9
  • मनसे 1
  • अपक्ष 5
जागा मिळाल्या होत्या स्पष्ट बहुमत मिळाल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला विरोधी पक्षात बसावे लागले होते.

अजित पवार स्वतःच मैदानात

गेली अनेक दशके पिंपरी चिंचवड महापालिकेवर असलेली अजित पवारांची सत्ता हातून गेल्याने यंदाच्या पालिका निवडणुकीमध्ये, पराभवाची सल भरून काढण्यासाठी अजित पवार स्वतःच मैदानात उतरले आहेत . तर दुसरीकडे ,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष ठेवून आहेत . काही दिवसांपूर्वीच तटकरे यांनी खोपोलीमध्ये पिंपरीतील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आगामी निवडणुका राष्ट्रवादी स्वबळावर लढण्यासंदर्भात आखणी केल्याची माहिती  आता पदाधिकाऱ्यांकडून दिली गेली आहे.
advertisement

राष्ट्रवादी नव्या चेहऱ्यांना संधी देईल का?

मात्र , दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार असतील तर प्रचाराचे कोणते मुद्दे घेऊन जनेतेसमोर जायचं हा मोठा प्रश्न आहे. कारण मागील तीन वर्षाच्या प्रशासकीय काळात भ्रष्टाचाराचा कळस गाठणारी अनेक प्रकरणं समोर आली होती.  2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय गणितं खऱ्या अर्थाने बदलायला सुरुवात झाली होती. 2017 मध्येच राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये विलीन झाले. त्यामुळे आता होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी नव्या चेहऱ्यांना संधी देईल का आणि ते चेहरे मतदार स्वीकारतील का याकडे सर्वांच लक्ष लागलंय
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीचा फडणवीस विरुद्ध पवार पॅटर्न, महायुतीत स्वबळाची ठिणगी
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement