IND vs SA : गंभीरच्या चुकांवर आता तिलक वर्माने पडदा टाकला, बॅटीग ऑर्डर बदलण्याच्या निर्णयावर काय बोलला?

Last Updated:

टीम इंडियाची प्रेस कॉन्फरेन्स पार पडली आहे. या प्रेस कॉन्फरेन्समध्ये टीम इंडियाचा स्टार फलंदाज तिलक वर्माने मुख्य कोच गौतम गंभीरच्या चुकांवर पडदा टाकला आहे.

tilak varma
tilak varma
India vs South Africa 3rd T20 :  धर्मशालाच्या मैदानावर उद्या रविवारी 14 डिसेंबर 2025 ला भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात तिसरा टी20 सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाची प्रेस कॉन्फरेन्स पार पडली आहे. या प्रेस कॉन्फरेन्समध्ये टीम इंडियाचा स्टार फलंदाज तिलक वर्माने मुख्य कोच गौतम गंभीरच्या चुकांवर पडदा टाकला आहे.
advertisement
खरं तर धर्मशालाच्या सामन्यापूर्वी आज भारताची पत्रकार परिषद पार पडली आहे.या पत्रकार परिषदेला तिलक वर्मा उपस्थित होता. यावेळी तिलक वर्माने सलामीवीर वगळता सर्वजण लवचिक आहेत. मी 3, 4, 5 किंवा 6 क्रमांकावर फलंदाजी करण्यास तयार आहे. संघाला जिथे आवडेल तिथे मी खेळेने असे सांगून त्याने गौतम गंभीरवर बॅटींग ऑर्डर बदलण्यावरून होणाऱ्या टीकेवर पडदा टाकला आहे.
advertisement
तिलक वर्माने अक्षर पटेलला नंबर 3 वर पाठवण्याच्या निर्णयावरही प्रतिक्रिया दिली. "जर संघाला वाटत असेल की एखादा विशिष्ट खेळ रणनीतिकदृष्ट्या सर्वोत्तम आहे, तर सर्वजण संघासोबत जातात." एक-वेळचे सामने होत राहतात. अक्षर पटेलने आधीच असेच केले आहे आणि त्याने तिथे चांगले प्रदर्शन केले आहे. ते परिस्थितीवर अवलंबून आहे,असे त्याने सांगितले. विशेष म्हणजे याआधी आम्ही वनडे क्रिकेटमध्ये पाहिलंय की अक्षर पटेल त्याच अंदाजात बॅटिंग करत होता. आम्हाला आज वाटत होतं की तो आजही तशीच बॅटिंग करेल पण दुर्देवाने तसं काही घडलं नाही,असे म्हणत त्याने देखील गंभीरच्या चुकावर पडदा टाकला होता.
advertisement
धर्मशाळेच्या पिचवर बोलताना तिलक वर्मा म्हणाला की थंड हवामान असूनही पृष्ठभाग फलंदाजांना अनुकूल असू शकतो.मी येथे यापूर्वी १९ वर्षांखालील भारताची मालिका खेळली आहे. आम्ही विकेट पाहत आहोत आणि मला वाटते की ती उच्च-स्कोअरिंग असेल. तसेच कमी तापमान सुरुवातीला गोलंदाजांना काही मदत करू शकते. संध्याकाळी ७ वाजता सामना सुरू होत असताना दव पडण्याची शक्यता असल्याचेही तिलक वर्मा म्हणाला आहे.
advertisement
"येथे खूप थंडी आहे, परंतु आम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार आहोत. जे मानसिकदृष्ट्या मजबूत आहेत ते सर्वत्र यशस्वी होतात.फलंदाजीच्या क्रमात बदल केल्याने माझ्या तयारीवर परिणाम होत नाही.आम्ही सरावात मूलभूत गोष्टींचे पालन करतो. मी नेहमीच विचार करतो की मी संघासाठी काय करू शकतो.
advertisement
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : गंभीरच्या चुकांवर आता तिलक वर्माने पडदा टाकला, बॅटीग ऑर्डर बदलण्याच्या निर्णयावर काय बोलला?
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement