विधानसभा निवडणूक प्रचाराची धामधूम, मजुरांना अच्छे दिन, खाऊन पिऊन दिवसाला इतके रुपये

Last Updated:

निवडणुका दरम्यान अनेक प्रश्नावर उमेदवार आश्वासने देताना पाहिला मिळतात आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रोजगार असतो. पण निवडणुकीच्या काळात येथील मजुरांना अच्छे दिन आले आहेत. 

+
मजूर 

मजूर 

प्राची केदारी, प्रतिनिधी 
पुणे : राज्यभर सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून निवडणुकाचा प्रचार देखील जोरदार सुरु असलेला पाहिला मिळत आहे. निवडणुका दरम्यान अनेक प्रश्नावर उमेदवार आश्वासने देताना पाहिला मिळतात आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रोजगार असतो. पुण्यातील अनेक ठिकाणी मजूर अड्डे असून येथील लोकांच्या रोजगाराचा प्रश्न हा मोठा आहे. पण निवडणुकीच्या काळात येथील मजुरांना अच्छे दिन आले आहेत.
advertisement
पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील डांगे चौक या ठिकाणी मजुरांचा अड्डा असून इथे जवळपास दोन ते अडीच हजार लोक ही या ठिकाणी असतात. प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भ या भागातून येणाऱ्यांची संख्या ही जास्त आहे. बरेच दिवस इथे अनेकांना काम देखील मिळत नाही. त्यांच्यासाठी कुठल्याही सुविधा देखील मिळताना पाहिला दिसत नाही. शहरातील अनेक भागात लोक कामासाठी थांबलेली पाहिला मिळतात. मात्र निवडणुकीच्या काळात येथील मजुरांना खाऊन पिऊन दिवसाला पैसे मिळत आहेत.
advertisement
यामध्ये अगदी 30 ते 75 वयोगटातील महिला पुरुष आहेत. तर उच्च शिक्षित तरुण देखील पाहिला मिळतात. पुणे जिल्यातील सर्वच मजूर अड्डयावर ही परिस्थिती पाहिला मिळते. जवळ पास चार ते पाच ठिकाणी हे मजुरांचा अड्डे आहेत. उदरनिर्वाहचा मोठा प्रश्न हा इथे या मजुरांना असतो.
advertisement
कधी चार दिवस पाच दिवस हाताला काम नसतं. सध्या निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. त्यासाठी देखील कधी बोलवलं जात, कधी बोलवलं जात नाही. जेव्हा बोलावलं जातं तेव्हा रोजगार हा 600 रुपये दिला जातो. पण इतरवेळी आमच्यासाठी कुठली ही सुविधा नाही. राहण्यासाठी घर नाही, पाणी असे सगळेच प्रश्न हे आहेत आणि या सगळ्या पासून आम्ही वंचित आहोत.
advertisement
तर रोज दोन हजारच्या संख्येने जे मजूर आहेत ते इथे येत असतात. परंतु त्यातील फक्त 500 ते 600 लोकांनाच रोजगार हा मिळतो. वाढती महागाईमुळे मिळणार रोजगार पुरतं नाही. त्यामुळे येथील प्रशासनाने आमचे प्रश्न सोडवावे, अशा भावना येथील मुजरांनी व्यक्त केल्या आहे.
मराठी बातम्या/पुणे/
विधानसभा निवडणूक प्रचाराची धामधूम, मजुरांना अच्छे दिन, खाऊन पिऊन दिवसाला इतके रुपये
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement