Pune News : दिसायला फटाके, चवीला मिठाई! पुण्यातील दुकानांमध्ये विक्रीसाठी आलेली 'फायरक्रॅकर स्वीट' पाहा अन् थक्क व्हा
- Reported by:Niranjan Sherkar
- local18
- Published by:Tanvi
Last Updated:
Pune News : होळीनिमित्त बाजारपेठेत विविध फटाक यांना ग्राहकांची मोठी मागणी असते. तर पुण्यातील मूर्ती बेकरी येथे चॉकलेटचे विविध प्रकारचे फटाके ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
पुणे : दिवाळी म्हणलं की गोडधोड फराळ, कपड्यांची खरेदी, फटाके या गोष्टींची खरेदी मोठ्या उत्साहात केली जाते. हीच गोष्ट लक्षात घेत पुण्यातील 88 वर्ष जुन्या मूर्ती बेकरी येथे चॉकलेटचे फटाके,चॉकलेटचे किल्ले,चॉकलेटचा फराळ उपलब्ध करून देण्यात आला आहे. याबाबतचे अधिक माहिती विक्रम मूर्ती यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
पारंपरिक फराळाचा सुगंध, बाजारपेठेतील दिवाळीची लगबग आणि नव्या पिढीची गोडी लक्षात घेऊन पुण्यातील नामांकित मूर्ती बेकरीने यंदा दिवाळीनिमित्त एक आगळावेगळा उपक्रम सुरू केला आहे. तब्बल 88 वर्षांपासून पुणेकरांच्या चवीचा गोड वारसा जपणाऱ्या या बेकरीत चॉकलेटचे फटाके, चॉकलेटचे किल्ले आणि चॉकलेटचा फराळ उपलब्ध करून दिला जात आहे.
दरवर्षी दिवाळी म्हटली की घराघरात फराळाचे पदार्थ तयार होतात .चकली, करंजी, लाडू, चिवडा... मात्र यंदा मूर्ती बेकरीने हाच पारंपरिक फराळ आधुनिक रूपात साकारला आहे. चॉकलेट बेसवर तयार केलेले मिनी फटाके, अनार, फुलबाज्या, तसेच चॉकलेटचा किल्ला हे आकर्षण ठरत आहे. विशेष म्हणजे हे सर्व पदार्थ पूर्णपणे खाद्यपदार्थांपासून तयार केलेले असून कोणतेही कृत्रिम रंग किंवा केमिकल नसलेले आहेत.
advertisement
मूर्ती बेकरीचे संचालक विक्रम मूर्ती सांगतात, ''दिवाळी ही आनंदाची, गोडीची आणि एकत्र येण्याची सण आहे. आजच्या मुलांना फटाके आवडतात, पण प्रदूषण आणि धोक्यामुळे पालक त्यांना परवानगी देत नाहीत. त्यामुळे आम्ही ‘चॉकलेट फटाक्यां’चा पर्याय आणला, जे तितकेच आकर्षक आणि सुरक्षित आहेत.''
बेकरीमध्ये चॉकलेट लाडू, करंजी, चिवडा, शेव, तसेच 'चॉकलेट अनार आणि रॉकेट'या विशेष डिझाईनमध्ये तयार केलेल्या गिफ्ट पॅकची विक्री जोरात सुरू आहे. पुणेकर ग्राहक या अनोख्या चॉकलेट फराळाला प्रचंड प्रतिसाद देत आहेत. सोशल मीडियावरही या ‘चॉकलेट दिवाळी’ची जोरदार चर्चा सुरू असून, अनेकांनी याला “परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम” असे संबोधले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 20, 2025 9:28 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : दिसायला फटाके, चवीला मिठाई! पुण्यातील दुकानांमध्ये विक्रीसाठी आलेली 'फायरक्रॅकर स्वीट' पाहा अन् थक्क व्हा









