बाप्पाच्या ओढीनं थायलंडचं कुटुंब पुण्यात, दगडूशेठ गणपतीच्या दर्शनानंतर म्हणाले...
- Published by:Aaditi Datar
Last Updated:
पुण्यातला गणेशोत्सव संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. दरवर्षी परदेशातूनही गणेश भक्त पुण्यात दर्शनासाठी येत असतात.
पुणे, 21 सप्टेंबर : गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहानं सुरूवात झालीय. बाप्पाच्या दर्शनासाठी सर्वत्र मोठी गर्दी होत आहे. पुण्यातला गणेशोत्सव संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. दरवर्षी परदेशातूनही गणेश भक्त पुण्यात दर्शनासाठी येत असतात. थायडलंडमधील बँकॉकमधून गणेशभक्तांनी दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. त्यांनी यावेळी बाप्पाची मनोभावे आरती देखील केली.
सकोन्लत आणि रोमलूक या बँकॉकमध्ये हॉटेल व्यावसायिक अदाम्पात्यानं 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया' या जयघोषात त्यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं. गणपती बाप्पावर आमची मोठी श्रद्धा आहे. आमच्या सर्व मनोकामना बाप्पांनी पूर्ण केल्या आहेत. गेल्या 10 वर्षांपासून आम्ही बाप्पाच्या भेटीसाठी आतूर होतो. यावर्षी आमची इच्छा पूर्ण झाली. त्यामुळे आम्ही आनंदी आणि समाधानी आहोत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
advertisement
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 131 व्या वर्षी गणेशोत्सवात अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. हजारो दिव्यांच्या प्रकाशात उजळलेले मंदिर पाहण्याकरिता गणेशभक्त. मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार 125 फूट लांब, 50 फूट रुंद आणि 100 फूट उंच आहे. प्रतिकृतीमध्ये 24 खांब व 24 कमानी उभारण्यात आले आहेत.
advertisement
मंदिराचा मुख्य घुमट 100 फुटांपेक्षा उंच असून ध्वजासहित सुमारे 108 फूट उंच मंदिर आहे. याशिवाय मंदिराचे छोटे आणि मोठे असे रेखीव 11 कळस आहेत. मुख्य सभागृहात श्री गणरायाचे मखर सोनेरी रंगाच्या छटांमध्ये असून सभोवती सुशोभित कमानी आहेत. मंदिर परिसर व मार्गामध्ये 60 खांबांवर वानरसेनेच्या मूर्तींसह रामायणातील घटनांचा आढावा हा चित्र आणि लेखन स्वरुपात मांडण्यात आला आहे.
advertisement
Location :
First Published :
September 21, 2023 10:23 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
बाप्पाच्या ओढीनं थायलंडचं कुटुंब पुण्यात, दगडूशेठ गणपतीच्या दर्शनानंतर म्हणाले...