Gaja Marne Pune: निवडणुकांच्या तोंडावर कुख्यात गुंड गजा मारणे तुरुंगाबाहेर पण कोर्टाने घातली एक अट
- Reported by:VAIBHAV SONAWANE
- Published by:Prachi Amale
Last Updated:
आज विशेष मोक्का न्यायालयाकडून गजानन मारणे याला आज जामीन मंजूर करण्यात आला आहे.
पुणे : कुख्यात गुंड गजानन मारणे याला 277 दिवसांनंतर कोथरुड आय टी इंजिनिअर मारहाण प्रकरणात विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. रस्त्यात मिरवणुक सुरु असल्याने वाहतूक कोंडी झाली असताना झालेल्या वादातून आय टी इंजिनिअरला मारहाण केल्याप्रकरणात कुख्यात गुंड गज्या मारणे याला विशेष मोक्का न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
मिरवणूक सुरु असताना वाहतूक कोंडी झाली होती. त्यात वादावादी होऊन एका आय टी इंजिनिअरला गजा मारणे याच्या साथीदारांनी मारहाण केली होती. हा आय टी इंजिनिअर मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या जवळचा असल्याचे सांगण्यात आले. मोहोळ यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर कोथरुड पोलिसांनी गजा मारणे याच्या चिथावणीमुळे त्याच्या साथीदारांनी मारहाण केल्याचा गजा मारणे व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला होता.
advertisement
गजानन मारणे याला आज जामीन मंजूर
गजा मारणे कारागृहातून बाहेर आला असून पोलिस आयुक्तालयात हजेरी लावली. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसमोर आज गजा मारणेने हजेरी लावली. पुणे महापालिकेच्या हद्दीबाहेर राहण्याच्या अटीवर जामीन झाल्याने तातडीने शहराबाहेर रवाना होणार आहे.
या प्रकरणात पोलिसांनी मकोका दाखल केला होता. त्यानंतर गजा मारणे याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली होती त्यानंतर आज विशेष मोक्का न्यायालयाकडून गजानन मारणे याला आज जामीन मंजूर करण्यात आला आहे.
advertisement
37 वर्षात तब्बल 28 गुन्हे
गजा मारणे याच्यावर आतापर्यंत डेक्कन, कोथरुड, सासवड, दत्तवाडी, पौड, कामोठा, शिरगाव, हिंजवडी, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे अशा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 28 गुन्हे दाखल आहेत. गजा मारणेवर चार वेळा मोक्का कारवाई करण्यात आली आहे. कुख्यात गुंड गजा मारणेवर 37 वर्षात तब्बल 28 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खुन, खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी, खंडणी मागण्याच्या गुन्हांचा समावेश आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Nov 28, 2025 8:47 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Gaja Marne Pune: निवडणुकांच्या तोंडावर कुख्यात गुंड गजा मारणे तुरुंगाबाहेर पण कोर्टाने घातली एक अट









