Alandi Metro Extensio : माऊलींच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी; पुणे मेट्रोचा आता आळंदीपर्यंत विस्तार

Last Updated:

Murlidhar Mohol On Pune Metro Project : पुणेच्या मेट्रोने माऊलींच्या भक्तांसाठी आनंदाची खास बातमी दिली आहे. पुणे मेट्रो आता आळंदीपर्यंत विस्तारित होणार असून, यामुळे संतज्ञानेश्वर समाधिस्थळाचा प्रवास भक्तांसाठी खूप सोपा आणि जलद होईल.

News18
News18
लोहगाव : लोहगाव ते आळंदीपर्यंत मेट्रो लाइन जोडण्याच्या योजनेवर मागील आठवड्यातच महा-मेट्रोचे संचालक श्रावण हर्डीकर यांच्यासोबत चर्चा झाली होती. या चर्चेत मेट्रो विस्ताराचा प्रस्ताव तयार करण्याचे सूचित करण्यात आले. याबाबत माजी नगरसेवक अनिल टिंगरे यांनीही पत्र सादर केले असून, त्यानुसार संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या समाधिस्थळापर्यंत मेट्रो कनेक्शन उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिला आहे.
रविवारी (दि. 31) विश्रांतवाडी येथे खासदार जनसंपर्क सेवा अभियान संपन्न झाले. या वेळी बोलताना मोहोळ म्हणाले की, आळंदी हे वारकरी संप्रदायाचे महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. येथे महाराष्ट्रभरातून लाखो भाविक वार्षिक दर्शनासाठी येतात. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागातून भाविकांची ये-जा मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळेच त्यांना प्रवास सुलभ होईल, यासाठी आळंदीपर्यंत मेट्रो विस्तारण्याचा विचार निश्चित केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
advertisement
कार्यक्रमात आमदार बापूसाहेब पठारे, माजी आमदार जगदीश मुळीक, उपायुक्त सोमय मुंडे, माजी नगरसेवक अनिल टिंगरे, राहुल भंडारे, संतोष खांदवे, सुनील खांदवे, प्रीतम खांदवे, धनंजय जाधव आणि पूजा जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी लोहगाव-धानोरी क्षेत्रातील अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. विशेषतहा डीपीआर, रस्ते मिसिंग लिंक, तसेच डिफेन्सच्या 900 मीटर आणि 100 मीटर परिसरातील नागरिकांच्या तक्रारी याबाबत माहिती घेतली गेली.
advertisement
मोहोळ म्हणाले की, डिफेन्स परिसरातील बांधकाम, परवानग्या, रस्त्यांचे रुंदीकरण, नवीन रस्ते यासंबंधी अनेक समस्या आहेत. या विषयावर स्वतंत्र बैठक बोलावून योग्य तो मार्ग काढला जाईल. तसेच विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न देखील विचाराधीन असून, कॅबिनेटच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आलेला आहे. लवकरच या बाबतीत निर्णय अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
एकंदरीत, आळंदीपर्यंत मेट्रो विस्तार आणि नागरिकांच्या सोयीसाठी विविध रस्ते आणि सुविधा सुधारणे हे योजनेत महत्त्वाचे आहे. या प्रकल्पामुळे भाविकांना प्रवास सोयीस्कर होईल आणि पुणे व आसपासच्या परिसरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होईल, असा विश्वास संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
मराठी बातम्या/पुणे/
Alandi Metro Extensio : माऊलींच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी; पुणे मेट्रोचा आता आळंदीपर्यंत विस्तार
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement