advertisement

Gautami Patil: गौतमी पाटीलकडून मदत मिळाली की नाही? जखमी रिक्षाचालकाची मुलगी अखेर खरं बोलली

Last Updated:

नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कारने रिक्षाला धडक दिलेल्या प्रकरणावरून आता आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे.

News18
News18
पुणे : नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कारने रिक्षाला धडक दिलेल्या प्रकरणावरून आता आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. गौतमी पाटील हिने रिक्षाचालक कुटुंबाला मदत दिली होती पण त्यांनीच ती नाकारली असा दावा केला आहे. त्यानंतर आता जखमी रिक्षाचालकाच्या मुलीने मात्र, आम्हाला मदत तर मिळाली होती, पण ते गौतमीचे मानलेले भाऊ होते का, हे त्यांनी सांगावं, असा अजब दावा केला आहे.
गौतमी पाटील हिच्या कारचालकाने ३० सप्टेंबर २०२५ रोजी पुण्यातील बंगळुरू हायवेवर अपघात झाला होता. गौतमी पाटीलच्या कारचालकाने रिक्षाला पाठीमागून धडक दिली होती. या प्रकरणी रिक्षाचालक मरगळे हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मात्र, या प्रकरणी मरगळे कुटुंबाने गौतमीवर गंभीर आरोप केले होते. पण, गौतमीने मदत दिल्याचा खुलासा केल्यानंतर रिक्षाचालकाची मुलगी  अपर्णा मरगळे हिने आता नवीन दावा केला आहे.
advertisement
'गौतमी पाटील यांनी सांगितलं की मानलेला भाऊ मदत घेऊन पोहोचला होता. आज आमच्याकडे ४ संघटना मदत घेऊन येतात. वेगवेगळी लोक मदत घेऊन येतात. आता यामध्ये गौतमी पाटील यांनी सांगावं की त्यांचा यातला मानलेला भाऊ कोणता. माझ्यापर्यंत, माझ्या आई किंवा माझ्या भावापर्यंत मदत घेऊन कोण आलं, हे गौतमी पाटील यांनी सांगावं, कोणत्या प्रकारे मदत केली हे सांगावं' अशी मागणीच अपर्णा मरगळेंनी केली.
advertisement
पण, मुळात गौतमीने पाटील यांनी सहनाभुती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जी काही मदत आम्हाला पाठवली ती आम्हाला आजपर्यंत कळालीच नाही. सगळं दु:ख आम्हाला झालं आहे. आमचा माणूस जखमी झाला आहे. पण गौतमी पाटील यांनी रडून दाखवलं. पण फक्त आम्ही त्यांना विचारलं की, गौतमी पाटील कुठे आहे, त्यांनी सांत्वन तरी करायला पाहिजे होतं. पण उलट त्यांनी आमचे शो ठरलेले असता रद्द करता येत नाही. असं सांगितलं. म्हणजे, इथं माणुसकीचं दहन झालं आहे. बरं ठीक आहे, त्या आम्हाला भेटायला आल्या नाही. त्यांनी फक्त फोन करून त्यांनी बाजू आमच्याकडे मांडायची असती, असंही अपर्णा मरगळे यांचं म्हणणं आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Gautami Patil: गौतमी पाटीलकडून मदत मिळाली की नाही? जखमी रिक्षाचालकाची मुलगी अखेर खरं बोलली
Next Article
advertisement
BMC Mayor Election: महापौर निवडीआधी मोठी घडामोड, शिंदे गटानं घेतला मोठा निर्णय, भाजपच्या रणनीतिला धक्का, ठाकरेंना दिलासा?
महापौर निवडीआधी मोठी घडामोड, शिंदे गटाचा मोठा निर्णय, भाजपच्या रणनीतिला धक
  • भाजप आणि शिंदे सेना यांच्यातील अंतर्गत हालचालींना वेग आला आहे.

  • महापौर निवडीसाठी काठावरचं बहुमत असलेल्या भाजप-शिंदे गटामध्ये सत्ता वाटपावर चर्चा

  • सत्ता संघर्षाच्या दरम्यान शिवसेना शिंदे गटाने महत्त्वाचा निर्णय घेतला

View All
advertisement