Rain in Maharashtra : मराठवाडा, विदर्भासाठी पुढील 2 दिवस महत्वाचे, हवामान खात्याकडून महत्त्वाचा इशारा

Last Updated:

राज्यातील काही ठिकाणी पावसाचा जोर जरी ओसरला असला तरी विदर्भासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता असून पश्चिममहाराष्ट्रात देखील पावसाच जोरदार कमबॅक असेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे.

गणेशोत्सव 2024
गणेशोत्सव 2024
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे : राज्यभरात सुरू असलेल्या पावसाने थोडीशी उसंत घेतली आहे. मात्र, मराठवाडा आणि विदर्भात येत्या 2 दिवसात तुफान पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यासोबतच येत्या 24 तासांत काही भागात हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
राज्यात मराठावाडा आणि विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार सरी बरसत आहेत. यामुळे या भागांतील नद्यांना पूर आला आहे. पावसाचा जोर अजून दोन दिवस कायम राहणार आहे. राज्यभर पावसाची परिस्थिती काय असेल याचबाबत घेतलेला हा आढावा.
advertisement
मुंबईमध्ये पावसाने विश्रांती घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या 2 दिवसापासून प्रचंड उकाडा जाणवत आहे. मात्र, येत्या आठवड्यात मुंबईतील जोरदार पाऊसाचं आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उद्या मुंबईत 32°C कमाल तर 24°C किमान तापमान असेल.
पुणे परिसरात पुढील 5 ते 7 दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे 7 आणि 8 तारखेला पुण्याच्या घाट विभागासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात उद्या कमाल 27°C तर किमान 21°C तापमान असेल.
advertisement
विदर्भामध्ये पुढील 2 दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ येथे मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भाच्या संपूर्ण भागासाठी पुढील 2 दिवस यलो अलर्ट दिला आहे. पुढील 4-5 दिवस तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये उद्या कमाल 30°C तर किमान 22°C तापमान असेल.
advertisement
रेल्वेच्या परिसरातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, एनजीओच्या माध्यमातून तरुणीचं कौतुकास्पद कार्य, VIDEO
यासोबतच दुसरीकडे मराठवाड्यातही सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली, परभणी जिल्ह्यात उद्यापासून काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पाऊस होईल, तर बीड व जालना याठिकाणी तूरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
राज्यातील काही ठिकाणी पावसाचा जोर जरी ओसरला असला तरी विदर्भासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता असून पश्चिममहाराष्ट्रात देखील पावसाच जोरदार कमबॅक असेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे.
मराठी बातम्या/पुणे/
Rain in Maharashtra : मराठवाडा, विदर्भासाठी पुढील 2 दिवस महत्वाचे, हवामान खात्याकडून महत्त्वाचा इशारा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement