IT पार्क हिंजवडीत भीषण अपघात; डंपरच्या धडकेत 20 वर्षीय तरूणीचा मृत्यू, वडिलांसमोर गेला जीव

Last Updated:

Pune Hinjewadi Accident : ट्रकने धडक दिल्यामुळे दुचाकीचा अपघात झाला आणि तरूणी चाकाखाली आली. 

News18
News18
पुणे :  पुण्यातील हिंजवडीत मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. आयटी पार्क हिंजवडी परिसरात ही घटना घडली आहे. डंपर ट्रक चालकाने एका तरूणीला चाकाखाली चिरडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरूणी आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून जात होती. वडील दुचाकीच्या मागे बसले होते. मात्र ट्रकने धडक दिल्यामुळे दुचाकीचा अपघात झाला आणि तरूणी चाकाखाली आली.
समोर आलेल्या माहितीनुसार, तरूणी आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून जात होती. तरूणी दुचाकी चालवत होती. पुनावडे रोडवरील लाइफ रिपब्लिक सोसायटी समोरून जात असताना भरधाव डंपर ट्रकने धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तरूणी आणि वडील रस्त्यावर पडले.तरूणी थेट डंपरच्या खाली आली आणि चाकाखाली चिरडली गेली. या अपघातात तन्वी सिद्धेश्वर साखरे (वय वर्ष २०) या निष्पाप तरूणीचा दुर्देवी मृत्यू झाला.
advertisement

आरोपीला हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या  

दरम्यान हा अपघात झाल्यानंतर डंपर चालक हा फरार झाला होता. मात्र सायंकाळच्या सुमारास फरार आरोपी अजय ढाकणे याला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत . या अपघातानंतर आता हिंजवडी पोलिसांना जाग आली असून पोलिसांकडून डंपर असेल किंवा रेडमी मिक्स वाहनांवर कडक कारवाई सुरू केल्याचे दिसत आहे. मात्र वारंवार होणाऱ्या या अपघातांच्या मालिकेला हिंजवडीतील रस्ते वाहतूक कोंडी आणि कोणतेही निर्बंध नसलेले जड वाहनाच्या वाहतुकीला नेमकं कोण जबादार आहे? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
advertisement
दरम्यान गेल्या 11 महिन्यांत या RMC ट्रक मुळे अपघात आतापर्यंत 7 महिलांचा मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत किती अपघात झाले?

  • 24 जानेवारी 2025
-प्रांजल यादव आणि आश्लेषा गावंडे यांचा अंगावर थेट सिमेंट मिक्सर कलंडला
  • 12 ऑगस्ट 2025
  • -प्रत्युषा बोराटे या 11 वर्षीय मुलीचा मृत्यू देखील सिमेंट मिक्सर च्या चाकाखाली येऊन झाला
    advertisement
  • 23 सप्टेंबर 2025
  • -राजेश्वरी चंद्रशेखरन अय्यर या 65 वर्षीय महिलेचा सिमेंट मिक्सरने भीषण धडकेत मृत्यू.
  • 10 ऑक्टोबर 2025 रोजी
  • -भारती मिश्रा यांचा सिमेंट मिक्सर च्या चाकाखाली येऊन मृत्यू
  • 17 नोव्हेंबर 2025 रोजी
  • -20 वर्षीय तन्वी साखरे हिचा डंपर खाली येत जागीच मृत्यू
    view comments
    मराठी बातम्या/पुणे/
    IT पार्क हिंजवडीत भीषण अपघात; डंपरच्या धडकेत 20 वर्षीय तरूणीचा मृत्यू, वडिलांसमोर गेला जीव
    Next Article
    advertisement
    Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
    परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
      View All
      advertisement