पुरुषांनी वॅक्सिंग करण्याआधी नक्की वाचाव्यात या 7 गोष्टी; नाहीतर होऊ शकतो त्रास
- Published by:Devika Shinde
Last Updated:
पुरुष वॅक्सिंग का करतात? यामागची कारणं तुम्हाला आश्चर्यचकित करतील, पण हे खरं आहे आणि वॅक्सिंग केल्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे हे देखील पाहाणं गरजेचं आहे.
आपल्या आजूबाजूला बघितलं तर वॅक्सिंग हा शब्द बहुतेकदा महिलांशी जोडला जातो. कॉलेजला जाणाऱ्या मुली, ऑफिसला जाणाऱ्या महिला, अगदी घरगुती बायकांपर्यंत सगळ्यांच्याच लाइफमध्ये वॅक्सिंग हा एक नेहमीचा ब्युटी रूटीनचा भाग असतो. त्वचा स्वच्छ दिसावी, केस कमी व्हावेत आणि व्यवस्थित ग्रूमिंग दिसावं म्हणून वॅक्सिंग केलं जातं. पण पुरुष? पुरुष वॅक्सिंग करतात हे अजूनही लोकांना ऐकायला नवीन वाटतं. अजूनही समाजात अशा गोष्टींविषयी कुतूहल, गैरसमज आणि थोडं हसूही दिसतं. पण आजच्या पिढीत चित्र झपाट्यानं बदलत आहे. फिटनेस, ग्रूमिंग आणि क्लीन लूक याला पुरुषही तेवढाच महत्व देऊ लागले आहेत.
advertisement
advertisement
1. स्वच्छ आणि नीटनेटका लूक : आजकाल ऑफीसपासून पार्टीपर्यंत सर्वत्र नीटनेटके दिसण्यालाच जास्त प्राधान्य. त्यामुळे हात-पाय किंवा छातीवरचे केस कमी करायला पुरुषही वॅक्सिंग निवडू लागले आहेत.2. फिटनेस आणि स्पोर्ट्स रूटीन : अ‍ॅथलीट्स, बॉडीबिल्डर्स किंवा स्विमर्स, केस नसल्यामुळे परफॉर्मन्स सुधारतो, स्किन इरिटेशन कमी होते. त्यामुळे वॅक्सिंग त्यांच्या दिनक्रमाचा भाग बनलं आहे.3. स्किन हायजीन आणि हेल्थ : स्किन श्वास घेताना अडथळे कमी व्हावेत, घामामुळे येणारा वास कमी व्हावा यासाठी वॅक्सिंगचा फायदा होतो.
advertisement
पुरुषांनी वैक्सिंग करण्यापूर्वी जाणून घ्याव्यात या 7 महत्त्वाच्या गोष्टीदिवसभर धुळीत, घामात फिरणाऱ्या पुरुषांच्या शरीरावर केस जलद वाढतात. अनेक जण आता स्वच्छ, स्मूद स्किनसाठी शेव्हिंगपेक्षा वैक्सिंगला प्राधान्य देत आहेत. पण पहिल्यांदाच वैक्सिंग करत असाल, तर योग्य माहिती नसल्यास त्रास, लालसरपणा किंवा इचिंगसारख्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे पुरुषांनी वैक्सिंग करण्यापूर्वी आणि नंतर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे.
advertisement
1. पहिल्यांदा वैक्सिंग करताना स्वतः करण्याचा प्रयोग करू नका. पुरुषांचे केस जाड आणि हार्ड असतात, त्यामुळे एकट्याने केल्यास वेदना जास्त होऊ शकतात. तज्ज्ञांजवळ वैक्सिंग केल्यास टेक्निक योग्य असते आणि वेदनाही तुलनेने कमी जाणवतात.2. वैक्सिंगच्या 1–2 दिवस आधी स्किन नीट एक्सफॉलिएट करा. याने डेड स्किन आणि ओव्हर-ऑइलिंग निघून जाते आणि केस सहज बाहेर येतात. नैसर्गिक स्क्रबही वापरू शकता. एक्सफॉलिएशनमुळे वैक्स अधिक स्मूद होते आणि वेदना कमी होतात.
advertisement
3. पुरुषांमध्येही बऱ्याच जणांची स्किन सेंसिटिव्ह असते. अशावेळी वैक्सिंग केल्यास लाल चट्टे, इचिंग किंवा बर्निंग होऊ शकते. पहिल्याच वेळी मोठा भाग वैक्स करण्याऐवजी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणं उत्तम.4. वैक्सिंगआधी आणि नंतर बर्फ लावल्याने वेदना कमी होतातवैक्सिंगच्या आधी स्किनवर बर्फ लावल्यास त्वचेतील पोर थोडी बंद होतात आणि वेदना कमी जाणवतात.वैक्सिंगनंतरही आइस-पॅक लावल्याने लालसरपणा, सूज किंवा इचिंग कमी होते.एलोवेरा जेलही उत्तम पर्याय आहे, कूलिंग इफेक्ट देतो.
advertisement
advertisement
advertisement


