advertisement

पुण्यातील ‘या’ 100 वर्ष जुन्या पुलाचा इतिहास तुम्हाला माहितीये का? पाहा कोणी केली होती बांधणी

Last Updated:

हा पूल पुण्यातील 100 वर्ष जुना आहे. काय इतिहास आहे जाणून घ्या.

+
News18

News18

पुणे, 27 सप्टेंबर : पुणे शहराचा अभ्यास करत असताना तेथील स्थानिक भौगोलिक परिस्तिथीचा अभ्यास करून बदल केल्याचं पाहिलं मिळतं. पुणे शहरात अनेक ऐतिहासिक वाडे वास्तू, तसेच पूल देखील आहेत. पूर्वी पुण्यामध्ये दोनच पूल होते. लाकडी पूल आणि कुंभारवाड्यापासून जाणारा पूल. परंतु पुण्याचा विस्तार वाढत गेला आणि त्यानंतर 1920 साली नवीन पूल बांधण्याचं ठरवण्यात आलं तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पूल यालाच मनपा पूल देखील म्हंटल जात. 1923 साली हा पूल बांधण्यात आला या 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. हा पूल कोणी बांधला आणि यांचा नेमका इतिहास काय आहे जाणून घेऊया.
काय आहे इतिहास?
1923 मध्ये मुंबई प्रांताचे गव्हर्नर जॉर्ज लॉईड यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर हा पूल लॉइड ब्रिज या नावाने ओळखला जाऊ लागला. गव्हर्नर जॉर्ज लॉईड यांचं नाव जरी या पुलाला असलं तरी या पुलाचा नकाशा काढण्यात गणपतराव महादेव केंजळे या मराठमोळ्या माणसाचा महत्वाचा वाटा आहे. गणपतराव केंजळे यांनी इतर अधिकाऱ्यांसोबत या पुलाच्या रचनेची जबाबदारी सांभाळली. केंजळे हे त्या काळातले प्रख्यात ठेकेदार होते. त्यांनीच या पुलाचे बांधकाम केलं आहे.
advertisement
केरळमधील पद्मनाभ स्वामींचं जालन्यात घ्या दर्शन, 2 महिने कष्ट करुन तयार केली कलाकृती
पण एक खास गोष्ट ही आहे की केंजळे हे निरक्षर होते. पण या 100 वर्षांपासून अधिक काळ उभ्या असलेल्या या पुलाकडे पाहून आपल्या लक्षात येते की ते निरक्षर असले तरी त्यांच्या बांधकामातले ज्ञान एका अभियंत्यापेक्षाही मोठं होते. या पुलाचा नकाशा काढण्यात गणपतराव महादेव केंजळे यांच्याबरोबर इतर अनेक अधिकाऱ्यांचा देखील सामावेश आहे. केंजळे हे त्या काळातले प्रख्यात ठेकेदार होते. त्यांनीच या पुलाचे बांधकाम केलेले आहे, असं इतिहास अभ्यासक संजय सोनवणे सांगतात.
advertisement
नितीन देसाईंच्या अनुपस्थितीमध्ये कसं पेललं शिवधनुष्य? कलाकारांनी सांगितला अनुभव
हा पुल संपूर्ण दगडी बांधकामात बांधण्यात आला असून त्यासाठी प्रामुख्याने काळ्या रंगाचा बेसाल्ट वापरला गेला आहे. या पुलाच्या रचनेत कमानी आणि बुरुजांसारख्या रचना आहेत. याच जागा पुलावरील जागेसाठी अर्धवर्तुळाकार जागा तयार करतात याचा वापर अनेकांना बसण्यासाठीही होतो. प्रत्येक कमानीच्या दोन्ही बाजूला सुंदर फुलांचे आकृतीबंध आपल्याला दिसून येतात.
advertisement
पुलाची मध्यवर्ती कमान वेगळी असून ती इतर कमानींपेक्षा किंचित अरुंद आणि टोकदार आहे. ही कमान पेशव्यांच्या निवासस्थानी असलेल्या शनिवार वाड्याच्या प्रवेशद्वाराशी साम्य साधणारी असल्याचे मानलं जातं. पुलाच्या दोन्ही बाजूला दगडी पायऱ्या असून खालीच थोरला शेख सल्लाचा दर्गा आहे,असंही संजय सोनवणे सांगतात.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यातील ‘या’ 100 वर्ष जुन्या पुलाचा इतिहास तुम्हाला माहितीये का? पाहा कोणी केली होती बांधणी
Next Article
इराणच्या हाती जगाला 'ऑफलाईन' करणारं महाभयंकर हत्यार; इंटरनेटचा 'ब्लॅकआउट' होणार? WhatsApp, Instagram, Google होणार ठप्प
इराणच्या हाती जगाला 'ऑफलाईन' करणारं महाभयंकर हत्यार; इंटरनेटचा 'ब्लॅकआउट' होणार? WhatsApp, Instagram, Google होणार ठप्प
  • इराणचा सर्वात मोठा इशारा!

  • एका सेकंदात संपूर्ण जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार?

  • जगाची डिजिटल लाइफलाईन कापून टाकणारा

View All
advertisement