Custard Apple Price : अबब! सीताफळाचे भाव गगनाला भिडले; पाहा 1 फळासाठी किती पैसे मोजावे लागणार?

Last Updated:

Purandar News : बाजारात सीताफळांची आवक घटली असून, भाव गगनाला भिडले आहेत. शेतकरी या परिस्थितीत आनंदी आहेत कारण यंदा सीताफळांना विक्रमी दर मिळत आहेत.

News18
News18
पुरंदर : पुरंदर तालुक्यातील मुख्य पीक सीताफळाचा हंगाम सध्या जोरात सुरू आहे. मात्र, यंदा एप्रिल-मे महिन्यातील उष्णतेसह झालेल्या अतिवृष्टीनंतर फळधारणा अपेक्षेपेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे बाजारात सीताफळांची आवक कमी असून शेतकर्‍यांना यंदा विक्रमी दर मिळत आहेत, ज्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नुकत्याच सुरू झालेल्या दिवे फळबाजारात शेतकर्‍यांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तसेच व्यापार्‍यांसाठी शेडची सुविधा उपलब्ध असल्याने हा बाजार शेतकरी आणि व्यापाऱ्यांना आकर्षक वाटतो. रांजणगाव, पिसर्वे आणि आसपासच्या गावांतून दररोज 500 ते 600 कॅरेट्स इतकी आवक होत आहे. मात्र, मालाची प्रमाणिकता कमी असल्यामुळे बाजारभाव उच्च पातळीवर पोहोचले आहेत.
पिसर्वे येथील शेतकरी सोपान वायकर यांनी आणलेल्या 2 कॅरेट्स सीताफळांना तब्बल 8 हजार रुपये असा भाव मिळाला. त्यातील काही मोठ्या फळांची किंमत 100 रुपयांच्या आसपास ठरली, जे हंगामातील आतापर्यंतचा सर्वोच्च दर आहे. वायकर यांनी सांगितले की, ''माझ्या 400 झाडांचे उत्पादन पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने केले जाते. त्यामुळे फळांचा आकार आणि रंग आकर्षक आहे. दिवे बाजारात उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे मी समाधानी आहे.''
advertisement
या मालाची खरेदी किशोर काळे या व्यापार्‍याने केली असून तो दिल्ली, कोलकाता आणि इतर राज्यांमध्ये पॅकिंग करून पाठवला जाणार आहे. बाहेरच्या राज्यांमध्ये मोठ्या आकाराच्या पुरंदर वाणाची प्रचंड मागणी असल्याने स्थानिक बाजारातही चांगला दर मिळत आहे, असे व्यापारी नितीन काळे आणि मयूर काळे यांनी सांगितले.
शेतकरी आणि व्यापार्‍यांचा मोठा प्रतिसाद पाहता हा दिवे बाजार या हंगामातील महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरत आहे. कमी माल असूनही उच्च भावामुळे शेतकर्‍यांना आर्थिक फायदा मिळत असून, सेंद्रिय पद्धतीने केलेले उत्पादन बाजारात विशेष ओळख निर्माण करत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Custard Apple Price : अबब! सीताफळाचे भाव गगनाला भिडले; पाहा 1 फळासाठी किती पैसे मोजावे लागणार?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement