Pune : पुणेकरांनो लक्ष द्या! निगडी ते चिंचवड मार्गाचा प्रश्न सुटणार; मेट्रोकडून आली मोठी अपडेट

Last Updated:

Pothole Repair Services : निगडी ते चिंचवड सेवा रस्ता दुरुस्तीसाठी महामेट्रोने तयारी दाखवली आहे. पक्क्या रस्ता बांधणीसाठी वाहतूक वळविण्याची मागणी केली जात असून काम सुरू झाल्यावर नागरिकांना सुकर आणि सुरक्षित मार्गाने प्रवास करता येईल.

News18
News18
पिंपरी : मेट्रोच्या कामामुळे निगडीतील भक्ती-शक्ती समूहशिल्प चौक ते चिंचवड स्टेशनपर्यंतचा सेवा रस्ता खड्ड्यांनी भरलेला आहे. या रस्त्यामुळे नागरिकांना दररोज प्रवास करताना मोठ्या त्रासाला समोरे जावे लागत असे त्यामुळे वाहतुक कोंडीही होत असे. अखेर नागरिकांच्या तक्रारींनंतर पुणे महामेट्रो प्रशासनाने हा रस्ता पक्का करण्यासाठी तयारी दर्शविली आहे.
पर्यायी मार्गाचा वापर करावा...
पक्का रस्ता करण्यासाठी रस्त्यावर काम करण्याची आवश्यकता आहे. ज्यासाठी काही दिवस रस्ता वाहतुकीसाठी बंद करून वाहतूक इतर मार्गाने वळवावी लागेल. महामेट्रोने या बदलासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडे प्रस्ताव पाठवला आहे. रस्ता मोकळा झाला की पक्का रस्ता तयार केला जाईल असे प्रशासनाने सांगितले आहे.
सध्या पिंपरी ते निगडी मेट्रो विस्तारित मार्गिकेचे काम सुरू आहे. त्यासाठी भक्ती-शक्ती समूहशिल्प चौक ते चिंचवडच्या एम्पायर इस्टेटपर्यंतचा सेवा रस्ता आणि बीआरटी मार्ग महामेट्रोकडे हस्तांतरित केला गेला आहे. हे अंतर साधारण 4.5 किलोमीटर आहे. या रस्त्याची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी आता महामेट्रोकडे आहे.
advertisement
सध्या भक्ती-शक्ती समूहशिल्प चौक ते चिंचवड स्टेशनपर्यंत मेट्रोचे काम सुरू आहे. रस्ता खोदणे, खांब उभारणी, व्हायाडक्टचे काम सुरू आहे. विनाअडथळा काम करता यावे म्हणून महामेट्रोने मार्गावर बॅरिकेड लावले आहेत. त्यामुळे सेवा रस्ता खूप अरुंद झाला आहे. पदपथ उखडून रस्ता कामासाठी वापरात आहे.
अरुंद रस्ता, वाहनांची जास्त गर्दी आणि पावसामुळे पडलेले खड्डे यामुळे वाहतूक खूप संथ आहे. सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळेत वाहनांची रांगा खूप लांब जातात. दहा मिनिटांच्या अंतरासाठी लोकांना अर्धा तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागतो.
advertisement
यापूर्वी सामाजिक संघटना, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि माजी नगरसेवकांनी खड्डेबाबत तक्रारी केल्या, पण योग्य दखल घेतली जात नव्हती. महापालिकेने महामेट्रोला तीन पत्रे पाठवली, तरीही कामाचा परिणाम दिसत नव्हता. आता महामेट्रोने प्रस्ताव दिला आहे की, काही दिवस वाहतूक बंद करून रस्ता पक्का केला जाईल.यामुळे नागरिकांना सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक सुविधा मिळेल.
मराठी बातम्या/पुणे/
Pune : पुणेकरांनो लक्ष द्या! निगडी ते चिंचवड मार्गाचा प्रश्न सुटणार; मेट्रोकडून आली मोठी अपडेट
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement