advertisement

आधी प्रेम; मग रिसॉर्टमध्ये केलं लग्न; शेवटी समोर आलं तौसिफचं असं सत्य की लोणावळ्यातील तरुणी हादरली, उचललं 'हे' पाऊल

Last Updated:

तिचा विश्वास संपादन करून त्याने तिला लोणावळ्यातील पवनानगर येथील 'द बॉम्ब हाऊस रिसॉर्ट'मध्ये नेले. तिथे तरुणीवर दबाव टाकून त्याने खोटे लग्न केले. मात्र, काही दिवसांनी..

लोणावळ्यातील तरुणीची फसवणूक (प्रतिकात्मक फोटो)
लोणावळ्यातील तरुणीची फसवणूक (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. नेरळमधील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 'लॅब असिस्टंट' म्हणून काम करणाऱ्या ३८ वर्षीय व्यक्तीने आपल्याच कॉलेजमधील १९ वर्षीय विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. यानंतर लग्नाचं आमिष दाखवून तिचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
बनावट लग्नाचा बनाव आणि ४ मुलांचे सत्य
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित तौसीफ निसार ठाणगे (वय ३८) याने सोशल मीडियाच्या माध्यमातून पीडित तरुणीशी जवळीक साधली. तिचा विश्वास संपादन करून त्याने तिला लोणावळ्यातील पवनानगर येथील रिसॉर्टमध्ये नेले. तिथे तरुणीवर दबाव टाकून त्याने खोटे लग्न केले. मात्र, काही दिवसांनी पीडितेला धक्कादायक वास्तव समजले. तौसीफ हा आधीच विवाहित असून त्याला चार मुले आहेत.
advertisement
तौसीफचे काळे कृत्य उघड झाल्यावर त्याने तरुणीला धमकावण्यास सुरुवात केली. "तुला जर माझ्यासोबत राहायचे असेल, तर तुला हिंदू धर्म सोडून मुस्लीम धर्म स्वीकारावा लागेल आणि बुरखा घालावा लागेल," अशी सक्ती त्याने केली. एवढ्यावरच न थांबता, या नराधमाने पीडितेच्या शिक्षणासाठी आलेले स्कॉलरशिपचे ४२ हजार रुपये देखील स्वतःच्या घशात घातले.
आपली फसवणूक आणि छळ होत असल्याचे लक्षात येताच तरुणीने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तौसीफविरुद्ध फसवणूक आणि धर्मांतरासाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
आधी प्रेम; मग रिसॉर्टमध्ये केलं लग्न; शेवटी समोर आलं तौसिफचं असं सत्य की लोणावळ्यातील तरुणी हादरली, उचललं 'हे' पाऊल
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement