Maharashtra HSC 12th Result 2024 : बारावीचा निकाल जाहीर, 93.37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

Last Updated:

बोर्डाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाणार आहे.  बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन संकेतस्थळावरून  निकालाची प्रिंटही काढता येईल.

News18
News18

पुणे : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र निकालासाठी अधिसूचना जारी करून निकाल जाहीर केला आहे. अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर केला जाणार आहे. बोर्डाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाणार आहे.  बारावीच्या विद्यार्थ्यांना  ऑनलाइन संकेतस्थळावरून  निकालाची प्रिंटही काढता येईल. सर्व विषयांचा सविस्तर निकाल संकेतस्थळावर दिसेल.

May 21, 20246:59 PM IST

How to Check HSC Result : बारावाची निकाल जाहीर, कसा आणि कुठे करायचा चेक

बारावीचा निकाल ऑनलाइन संकेतस्थळावरही जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी त्यांचा बैठक क्रमांक, आईचे नाव ही माहिती आवश्यक आहे. बोर्डाच्या संकेतस्थळाशिवाय इतर ठिकाणीही ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे.

May 21, 20245:10 PM IST

HSC Result : विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक 97.82 टक्के

बारावी परीक्षेत कला शाखेचा निकाल सर्वात कमी लागला असून 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर विज्ञान शाखेचा निकाल 97.82 टक्के लागला. वाणिज्य शाखेचा निकाल 92.18 टक्के तर व्यवसाय अभ्यासक्रमाचे 87.75 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आयटीआयचा निकाल 87.69 टक्के लागला आहे.

May 21, 20245:09 PM IST

HSC Result : विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक 97.82 टक्के

बारावी परीक्षेत कला शाखेचा निकाल सर्वात कमी लागला असून 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर विज्ञान शाखेचा निकाल 97.82 टक्के लागला. वाणिज्य शाखेचा निकाल 92.18 टक्के तर व्यवसाय अभ्यासक्रमाचे 87.75 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आयटीआयचा निकाल 87.69 टक्के लागला आहे.

advertisement
May 21, 20244:57 PM IST

राज्यात 21 संस्था आणि 7 कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के

बारावीच्या परीक्षेत २६ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर राज्यातील २१ संस्थांचा निकाल शून्य टक्के लागल्याची माहिती बोर्डाने दिली. या संस्थांमध्ये बहुतांश संस्था या आयटीआयच्या असल्याचं सांगण्यात येतंय.

May 21, 20244:55 PM IST

राज्यातील 9 विभागात कोकण अव्वल, नाशिक, पुणे, कोल्हापूरचा निकाल 94 टक्के

बोर्डाने जाहीर केलेल्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे.

कोकण 97.51
नाशिक 94.71
पुणे 94.44
कोल्हापुर 94.24
संभाजीनगर 94.08
अमरावती 93.00
लातूर 92.36
नागपूर 92.12
मुंबई 91.95

May 21, 20244:48 PM IST

बारावीच्या निकालात मुलींचीच बाजी, यंदा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाणही वाढले.

बारावीच्या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारलीय. यंदा बारावीच्या निकालाचा टक्का वाढला असल्याची माहिती बोर्डाने दिली. दुपारी एक वाजता सहा संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेची प्रिंट काढता येणार आहे.

advertisement
May 21, 20244:46 PM IST

HSC Result : विभागीय निकालात कोकण अव्वल, मुंबईचा सर्वात कमी निकाल

बोर्डाची परीक्षा ९ विभागीय मंडळात झाली. दिव्यांग विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 94.20 टक्के इतकी आहे. तर सरासरी टक्केवारी ९१.८७ टक्के इतकी आहे. कोकण विभागाने पुन्हा बाजी मारली असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे.

May 21, 20244:43 PM IST

बारावीचा निकाल 93.37 टक्के, पुन्हा कोकण विभागाची बाजी

यंदा बारावीच्या परीक्षेचा निकाल 93.37 % इतका लागला आहे. 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती बोर्डाने दिली.

May 21, 20244:37 PM IST

HSC Result : बारावीचा निकाल जाहीर, बोर्डाची पत्रकार परिषद

बारावीचा निकाल दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर होणार असून बोर्डाने पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली. शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावरून निकाल पाहता येणार आहे.

May 21, 20244:30 PM IST

बारावीच्या परीक्षेला राज्यात १५ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

ऑनलाइन निकाल जाहीर करण्याआधी सकाळी अकरा वाजता बोर्ड पत्रकार परिषद घेणार आहे. यात विभागनिहाय निकाल जाहीर केला जाईल. बारावीची परीक्षा १ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत झाली. बारावीच्या परीक्षेला राज्यात १५ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

May 21, 20244:29 PM IST

How to Check HSC Result : बारावीचा निकाल आज, कुठे करायचा चेक?

बारावीचा निकाल आज लागणार असून दुपारी एक वाजता बोर्डाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर होणार आहे. निकाल पुढील संकेतस्थळावर पाहता येईल.
1) mahresult.nic.in
2) https://hscresult.mkcl.org/
3) www.mahahsscboard.in
4) https://results.digilocker.gov.in

मराठी बातम्या/पुणे/
Maharashtra HSC 12th Result 2024 : बारावीचा निकाल जाहीर, 93.37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement