Pune : नाद करा पण पुणेकरांचा कुठं! बंगळुरूच नाही तर गुजरातलाही मागं सोडून पटकावला अव्वल क्रमांक
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Maharastra Becomes EV Sales hub : पुणे आता देशातील ई-वाहन विक्रीचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. राज्यभरात यंदा 2 कोटी 41 लाख ई-वाहनांची विक्रमी विक्री झाली असून, यातून महाराष्ट्राने एक नवा इतिहास रचला आहे.
Electric Vehicles : महाराष्ट्राने ई-वाहन विक्रीत उत्तर प्रदेशला मागे टाकून देशात प्रथम क्रमांक पटकावला असतानाच, या यशात पुणे शहराने मुंबईलाही मागे टाकत विक्रीत देशात अव्वल स्थान मिळवले आहे. ई-वाहनांच्या वाढत्या स्वीकारामुळे, पुणे आता देशातील ई-वाहन विक्रीचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. राज्यभरात यंदा 2 कोटी 41 लाख ई-वाहनांची विक्रमी विक्री झाली असून, यातून महाराष्ट्राने एक नवा इतिहास रचला आहे.
पुण्यात सर्वाधिक ई-वाहनांची विक्री
या राज्यव्यापी यशात पुणे शहराचा वाटा सिंहाचा आहे. मुंबईसारख्या महानगरालाही मागे टाकत पुण्यात सर्वाधिक ई-वाहनांची विक्री झाली आहे. बंगळूरु, सुरत आणि जयपूरसारख्या मोठ्या शहरांनाही पुण्याने मागे टाकले आहे, ज्यामुळे 'ई-वाहन शहर' म्हणून पुण्याची ओळख निर्माण झाली आहे. ई-वाहनांच्या विक्रीत महाराष्ट्र आणि पुणे जरी आघाडीवर असले तरी, तज्ज्ञांच्या मते, उत्पादन कारखान्यांच्या विस्तारात महाराष्ट्र अजूनही हैदराबाद, दिल्ली आणि बंगळूरु या शहरांच्या तुलनेत मागे आहे. संशोधन आणि विक्रीत आघाडी घेतलेल्या महाराष्ट्राला आता उत्पादन क्षेत्रातही लक्षणीय प्रगती करणे आवश्यक आहे.
advertisement
हवेतला प्रवासही स्वस्त होणार
2020 नंतर, कोरोनाच्या लाटेमुळे ई-वाहनांवरील संशोधन वेगाने वाढले आणि 2021 पासून या विक्रीने मागे वळून पाहिलेच नाही. आज दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांसह इलेक्ट्रिक विमानेही विकसित होत असल्याने, भविष्यात हवेतला प्रवासही अधिक परवडणारा होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
पायाभूत सुविधांमुळे ई-वाहनांचा स्वीकार
advertisement
टियर-1 (Tier-1) शहरातील वाढती जागरूकता आणि आधुनिक पायाभूत सुविधांमुळे ई-वाहनांचा स्वीकार वेगाने होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कर्नाटकात (Karnataka) बंगळूरुने राज्याच्या एकूण ईव्ही विक्रीपैकी 55 टक्के (भारताच्या एकूण 5 टक्के) वाटा उचलला आहे, तर गुजरातमधील (Gujarat) सुरत (25 टक्के) आणि अहमदाबाद (21 टक्के) त्यांच्या राज्याच्या ईव्ही वाट्यात आघाडीवर आहेत. दिल्ली-एनसीआरमध्येही (Delhi-NCR) 37,343 ईव्ही (EV) कार्सची संख्या लक्षणीय आहे.
advertisement
टेस्ला आणि मर्सिडिजला हवाय महाराष्ट्र
भारतात ई-वाहनांचे उत्पादन 2011 मध्ये 'FAMEHV' (Faster Adoption and Manufacturing of Electric and Hybrid Vehicle) योजनेने औपचारिकरित्या सुरू झाले. 2015 मध्ये 'फेम-1' आणि 2019 मध्ये 'फेम-2' योजना सुरू झाल्याने या क्षेत्राला मोठी गती मिळाली. आता नुकताच 'टेस्ला'ने मुंबईत पहिले स्टोअर उघडून भारतीय बाजारात प्रवेश केला आहे. तसेच, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात घोषणा केली आहे की, मर्सिडिज इलेक्ट्रिक कारचे उत्पादन पुणे जिल्ह्यातील चाकण एमआयडीसीमध्ये करण्यास उत्सुक आहे. यामुळे ईव्ही कार उत्पादकांचे भारताच्या बाजारपेठेकडे अधिक लक्ष वेधले जात आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
July 28, 2025 12:41 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune : नाद करा पण पुणेकरांचा कुठं! बंगळुरूच नाही तर गुजरातलाही मागं सोडून पटकावला अव्वल क्रमांक


