Gautami Patil Accident: गौतमी पाटीलच्या अडचणी वाढल्या! पुणे अपघात प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला 'तो' निर्णायक पुरावा; मोठी खळबळ

Last Updated:

Gautami Patil Accident Update : गौतमी पाटील मोठ्या अडचणीत सापडली आहे. पुण्यातील रिक्षा अपघात प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठा निर्णायक पुरावा लागला आहे.

News18
News18
पुणे : पुण्यातील सिंहगड रोडवर झालेल्या अपघाताने शहरात एकच मोठी खळबळ उडवून दिली होती. एका आलिशान कारने रिक्षाला मागून जोरदार धडक दिली होती ज्यामुळे रिक्षा तीन वेळा पलटी झाली. या भयंकर धडकीत रिक्षाचालक गंभीर जखमी झाला, पण त्याला वाचवण्यासाठी आसपास कोणीही पुढे येत नाही. अपघातानंतर गाडीतील लोक थेट उतरून निघून गेले आणि रिक्षाचालक रस्त्यावर गंभीर अवस्थेत पडून राहिला. स्थानिकांनी रिक्षाचालकाला तत्काळ रूग्णालयात दाखल केले. मात्र, काही वेळातच अपघातग्रस्त गाडी तिथून टोईंग व्हॅनद्वारे नेण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे ही गाडी कोणीतरी अज्ञात व्यक्तीची नसून गौतमी पाटीलची होती.
जखमी रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी फक्त कारवाई नाही, तर गौतमी पाटीलवर त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली असून त्यांनी पोलिस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन केले. रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडून सहकार्य न मिळाल्याचा गंभीर आरोप केला आहे.
याबाबत चंद्रकांत पाटील यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांनी थेट डीसीपींना फोन करून प्रकरणाची माहिती दिली आणि तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी विशेष पथक नेमले असून अपघातानंतर वाहन ज्या क्रेनच्या साह्याने हलवले गेले, त्या ट्रेनचालकाची चौकशी करण्यात आली आहे. पोलीस तपासातून समोर आले आहे की, अपघातानंतर गौतमी पाटीलच्या वाहनचालकानेच क्रेन अपघातस्थळी बोलवल्याचे उघड झाले आहे.
advertisement
या प्रकरणात पोलिसांवर दबाव वाढल्याचे दिसून येत आहे. चंद्रकांत पाटीलनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना प्रकरणाची माहिती देऊन त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले. पोलिसांनी सिंहगड रोड पोलीस स्थानकाच्या वरिष्ठ निरीक्षकांना प्रोग्रेस रिपोर्ट तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
या घटनाक्रमामुळे गौतमी पाटीलची परिस्थिती गंभीर होत आहे. अपघाताच्या भयंकर स्वरूपामुळे आणि रिक्षाचालकाच्या गंभीर स्थितीमुळे प्रकरणावर ऐनवेळी कायदेशीर आणि सामाजिक दोन्ही दबाव निर्माण झाला आहे.
advertisement
स्थानिक नागरिक, राजकीय पक्ष आणि उच्च अधिकाऱ्यांचा लक्ष वेधून घेतल्यामुळे आता गौतमी पाटील मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. शहरात या अपघाताबद्दल तीव्र चर्चेचा आणि संतापाचा वातावरण आहे, आणि प्रकरण लवकरच न्यायालयीन आणि प्रशासनिक पातळीवर गती पकडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या/पुणे/
Gautami Patil Accident: गौतमी पाटीलच्या अडचणी वाढल्या! पुणे अपघात प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला 'तो' निर्णायक पुरावा; मोठी खळबळ
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement