पुण्यात अल्पवयीन मुलीवर 3 वर्षे अत्याचार, कौटुंबीक ओळखीचा फायदा घेत जाळ्यात अडकवलं, मग सुरू झाला भयंकर प्रकार
- Published by:Ravindra Mane
- Reported by:VAIBHAV SONAWANE
Last Updated:
Pune Crime News: पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथं एका अल्पवयीन मुलीवर तब्बल तीन वर्षे लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे.
Pune Crime News: पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथं एका अल्पवयीन मुलीवर तब्बल तीन वर्षे लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. हा अत्याचार दुसरा तिसरा कुणी नव्हे तर कौटुंबीक ओळख असलेल्या एका नराधमाने केला आहे. आरोपीनं पीडित मुलीचे अश्लील फोटो काढून, संबंधित फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिचं वारंवार लैंगिक शोषण केलं आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.
संजय कुलकर्णी असं गुन्हा दाखल झालेल्या नराधम आरोपीचं नाव आहे. त्याच्यावर लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (POCSO) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय कुलकर्णी याने कौटुंबिक ओळखीचा गैरफायदा घेऊन अल्पवयीन मुलीचे काही खाजगी फोटो काढले होते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तो गेल्या तीन वर्षांपासून मुलीवर अत्याचार करत होता. या भीतीपोटी मुलगी गप्प राहिली, मात्र अखेर तिची सहनशीलता संपली.
advertisement
मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांनी हिंमत करून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि संजय कुलकर्णीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपीला लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून, आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 18, 2025 8:57 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात अल्पवयीन मुलीवर 3 वर्षे अत्याचार, कौटुंबीक ओळखीचा फायदा घेत जाळ्यात अडकवलं, मग सुरू झाला भयंकर प्रकार