Patan News: नदीवर मासेमारीसाठी गेला अन् अचानक फिट आली, 'ती' घटना ऐकून पाटण हादरलं!

Last Updated:

Patan News: गणेशोत्सव विसर्जनाच्या दिवशीच पाटण तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. गुंजाळी गावात मासेमारीसाठी गेलेले महादेव रामचंद्र लाड...

Patan News
Patan News
पाटण (सातारा) : गणेशोत्सव विसर्जनाच्या दिवशीच पाटण तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. गुंजाळी गावात मासेमारीसाठी गेलेले महादेव रामचंद्र लाड (वय 47) यांचा कोयना नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी, 6 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली.
गणपती विसर्जन आणि नियतीचा क्रूर खेळ
गुंजाळी गाव कोयना नदीच्या काठावर आहे. महादेव लाड शनिवारी दुपारी नेहमीप्रमाणे मासेमारीसाठी नदीवर गेले होते. पण त्या दिवशी गावात गणपती विसर्जन असल्यामुळे सर्वजण त्यात व्यग्र होते आणि महादेव यांच्याकडे कोणाचेही लक्ष नव्हते.
रात्री उशिरापर्यंत महादेव घरी परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. तेव्हा कोयना नदीपात्रातील सिंचन योजनेजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. महादेव लाड यांना 'फिट्स' (फेफरे) येण्याचा आजार होता. त्यामुळे त्यांना अचानक फिट येऊन ते नदीत पडले असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
advertisement
या घटनेमुळे लाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची नोंद पाटण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या/क्राइम/
Patan News: नदीवर मासेमारीसाठी गेला अन् अचानक फिट आली, 'ती' घटना ऐकून पाटण हादरलं!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement