आयुष कोमकरची हत्या, पण खरा पिक्चर वेगळाच होता? टिपू पठाण टोळीने लावली होती फिल्डिंग, तपासात काय समोर आलं?

Last Updated:

यश पाटील आणि अमित पाटोळे यांच्या अटकेनंतर आता कोमकर अन् गायकवाड टोळीविरोधात आंदेकर टोळीला टिपू पठाण टोळीने मदत केल्याचं देखील समोर येत आहे.

News18
News18
पुण्यात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आंदेकर टोळीने आयुष कोमकरची गोळ्या घालून हत्या केली. मागील वर्षी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला म्हणून आयुषची हत्या केल्याची माहिती आता समोर आली आहे. या प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकरसह एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी यश पाटील आणि अमित पाटोळे यांना अटक देखील केली आहे. या अटकेनंतर आता कोमकर अन् गायकवाड टोळीविरोधात आंदेकर टोळीला टिपू पठाण टोळीने मदत केल्याचं देखील समोर येत आहे.

कोमकर -गायकवाड टोळीकडून वनराजची हत्या

खरं तर, गेल्या वर्षी वनराज आंदेकर यांना कोमकर आणि सोमनाथ गायकवाड यांच्या टोळीने कोयत्याने वार करून आणि गोळ्या घालून मारलं होतं. या हत्येनंतर आंदेकर टोळीने गायकवाड आणि कोमकर टोळीतील साथीदारांना मारण्याचा कट रचला होता. यातून शुक्रवारी पाच सप्टेंबरला नाना पेठेत वनराजच्या हत्येतील मुख्य आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुषला गोळ्या घालून संपवलं. आयुषची हत्या झाली असली, तरी आंदेकर टोळीचा खरा पिक्चर वेगळाच होता, अशी माहिती आता समोर आली आहे.
advertisement

गायकवाड टोळीवर हल्ल्याचा प्लॅन?

आंदेकर टोळीचा साथीदार दत्ता काळे यांने आंबेगाव पठार परिसरात गायकवाड गटातील साथीदारांच्या घराची रेकी केली होती. आयुषची हत्या होण्याच्या चार दिवस आधी पोलिसांनी आंदेकर टोळीचा कट उधळून दत्ता काळेला अटक केली होती. पण गायकवाड टोळीच्या साथीदारावर हल्ला करण्यासाठी आंदेकर टोळीला टिपू पठाण टोळीने मदत केल्याची माहिती आहे. हल्ल्यासाठी लागणाऱ्या शस्त्रांची व्यवस्था या टोळीमार्फत केली जात असल्याचीही माहिती आहे.
advertisement

पठाण टोळीच्या दोघांना पकडलं

वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार घाडगे यांच्या गुन्हे शाखा पथकाला माहिती मिळाली होती की, टिपू पठाण टोळीचे दोन सदस्य तालीम खान आणि युनूस हे सोमवार पेठ परिसरात शस्त्रांसह थांबले आहेत. पोलीस उपनिरीक्षक राहुल मखरे आणि पथकाने सापळा रचून दोघांना पकडलं. त्यावेळी दोघांकडे गावठी पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली होती.
advertisement
तपासात समोर आले की, वनराज आंदेकर यांच्या खुनातील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते आणि इतर साथीदारांची घरं आंबेगाव पठार परिसरात आहेत. या घरांची रेकी करून, योग्य संधी पाहून गायकवाड गटावर हल्ला करण्याचा कट आखला गेला होता. यात दत्ता काळे, कृष्णा आंदेकर, अमन पठाण, यश पाटील आणि टिपू पठाण टोळीतील काही सदस्यांचा सहभाग होता. काळे याने गायकवाड गटाच्या सदस्यांच्या घरांची माहिती गोळा केली. यासाठी कृष्णा आंदेकरने हल्ल्यासाठी अमन पठाणला बोलावण्याची तयारी केली. यासाठी खोली भाड्याने घेण्यासाठी पैसे दिले गेले, अमन पठाणनेच पुढे “लक्ष ठेवा, बाहेर आला की कळवा” अशी सूचना दिल्याचं पोलिस तपासात उघड झालं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आयुष कोमकरची हत्या, पण खरा पिक्चर वेगळाच होता? टिपू पठाण टोळीने लावली होती फिल्डिंग, तपासात काय समोर आलं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement