advertisement

'आम्ही पण दुसऱ्याच्या छातीवर चढू शकतो, मै डंडा लेके..' पुण्यात गडकरींचा 'डॅशिंग' अवतार, कोणाला सुनावले खडेबोल?

Last Updated:

यावेळी गडकरींनी आपल्या कार्यपद्धतीवर भाष्य करताना म्हटलं, मी दांडकं घेऊन बसलोय, मला मॅनेज करणारा अजून जन्माला यायचा आहे.

पुण्यात गडकरींचा 'डॅशिंग' अवतार
पुण्यात गडकरींचा 'डॅशिंग' अवतार
पुणे: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. पुण्यात आयोजित एका 'ग्रीन एनर्जी'विषयक कार्यक्रमात बोलताना गडकरींनी पुन्हा एकदा आपल्या आक्रमक शैलीत पेट्रोलियम लॉबीवर जोरदार निशाणा साधला. "माझ्या विरोधात पेट्रोलियम लॉबी मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. त्यांना ग्रीन एनर्जीने प्रगती केलेली आवडत नाही," असे म्हणत त्यांनी या लॉबीला थेट आव्हान दिले आहे.
"मला मॅनेज करणारा अजून जन्माला यायचा आहे"
यावेळी गडकरींनी आपल्या कार्यपद्धतीवर भाष्य करताना म्हटलं, "मी दांडकं घेऊन बसलोय, मला मॅनेज करणारा अजून जन्माला यायचा आहे. अच्छा काम करो, नहीं तो मै ठोकता हूं !" त्यांच्या या विधानाने असंही थेट शब्दांत त्यांनी सांगितलं. गडकरींनी स्पष्ट केलं की, देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी ते कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीत.
advertisement
"आम्ही दुसऱ्याच्या छातीवर चढू शकतो"
पेट्रोलियम लॉबीच्या अडथळ्यांवर बोलताना गडकरी अधिक आक्रमक झाले. ते म्हणाले, "जे लढाई सोडून पळतात, ते संपतात. भीती बाळगण्याची अजिबात गरज नाही. आम्ही सुद्धा दुसऱ्याच्या छातीवर चढू शकतो! आम्ही चढू, लढू, जिंकू आणि यशस्वी होऊ." आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर आपण अनेक अशक्य वाटणाऱ्या योजना यशस्वी करून दाखवल्या आहेत, असंही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केलं.
advertisement
पुण्यातील या कार्यक्रमात त्यांनी तरुण उद्योजकांना आणि ग्रीन एनर्जी क्षेत्रात काम करणाऱ्यांना आत्मविश्वास न सोडण्याचं आवाहन केलं. गडकरींची ही 'दमदार' टोलेबाजी सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
'आम्ही पण दुसऱ्याच्या छातीवर चढू शकतो, मै डंडा लेके..' पुण्यात गडकरींचा 'डॅशिंग' अवतार, कोणाला सुनावले खडेबोल?
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement