advertisement

Eknath Shinde: "हो, विमान पाडण्याचा इशारा मिळाला होता! एकनाथ शिंदेंनी सांगितला थरार, रोहित पवारांचा दावा

Last Updated:

Eknath Shinde: मागील पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जीवही व्हीएसआरमुळे धोक्यात आल्याचा दावा पवारांनी केला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत या घटनेबाबत चर्चा केली असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले.

"हो, विमान पाडण्याचा इशारा मिळाला होता! एकनाथ शिंदेंनी सांगितला थरार, रोहित पवारांचा दावा
"हो, विमान पाडण्याचा इशारा मिळाला होता! एकनाथ शिंदेंनी सांगितला थरार, रोहित पवारांचा दावा
मुंबई: दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीच्या मुद्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार कमालीचे आक्रमक झाले आहेत. रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत तांत्रिक मुद्दे उपस्थित केले होते. मागील पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जीवही व्हीएसआरमुळे धोक्यात आल्याचा दावा पवारांनी केला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत या घटनेबाबत चर्चा केली असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले.

एकनाथ शिंदे यांचा दुजोरा?

अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीच्या मुद्यावर रोहित पवार हे विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीदेखील भेट घेतली. २०२३ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोस दौऱ्यावर जात असताना, त्यांचे विमान पाडण्याचा इशारा इराण आणि इराकच्या लष्कराने दिला होता, असा खळबळजनक दावा आमदार रोहित पवार यांनी केला होता. विशेष म्हणजे, खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या या दाव्याला दुजोरा दिला असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे. रोहित पवार म्हणाले की, "मी जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, तेव्हा त्यांनी स्वतः ही घटना घडल्याचे मान्य केले." आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रोटोकॉल आणि सुरक्षेच्या बाबतीत इतकी मोठी चूक कशी झाली, असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
advertisement

नेमकी घटना काय?

रोहित पवार यांच्या दाव्यानुसार, १६ ते २० जानेवारी २०२३ दरम्यान मुख्यमंत्री दावोसला (स्वित्झर्लंड) जात होते. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार, कोणत्याही देशाच्या हवाई हद्दीतून जाताना 'फ्लाईट प्लॅन' द्यावा लागतो आणि पूर्वपरवानगी घ्यावी लागते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या विमानाने हवाई उड्डाणाची योग्य परवानगी घेतली नव्हती. इंधन भरल्यानंतर (Refueling) विमान जेव्हा झुरिकच्या दिशेने निघाले, तेव्हा ते इराणच्या हद्दीत शिरले.
advertisement

'नाहीतर विमान पाडू!'

इराणच्या लष्करी यंत्रणेने तातडीने संदेश पाठवून विमानाला हटकले. "तुम्ही जर आत्ताच्या आता मागे वळला नाही, तर तुमचे विमान आम्ही पाडू," असा थेट इशारा इराणने दिला. या विमानात स्वतः एकनाथ शिंदे आणि शासनाचे वरिष्ठ अधिकारी बसलेले होते. इराणच्या इशाऱ्यानंतर वैमानिकाने विमान इराकच्या दिशेला वळवले, मात्र तिथेही तोच अनुभव आला. इराकनेही परवानगी नसल्यामुळे कडक पवित्रा घेतला. अखेर विमानाला मागे फिरावे लागले आणि सर्व तांत्रिक परवानग्या मिळवल्यानंतरच हे विमान पुन्हा झुरिककडे रवाना झाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde: "हो, विमान पाडण्याचा इशारा मिळाला होता! एकनाथ शिंदेंनी सांगितला थरार, रोहित पवारांचा दावा
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement