पिंपरी-चिंचवडकरांनो तुमच्या गाडीला 'अशी' नंबरप्लेट? आता पंपांवर पेट्रोलच मिळणार नाही; पोलिसांचं मोठं पाऊल

Last Updated:

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आता गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी थेट पेट्रोल पंपांवरून कारवाईचा बडगा उगारला आहे. ज्या गाड्यांना फॅन्सी नंबरप्लेट्स आहेत किंवा ज्यांच्या काचा काळ्या आहेत, त्यांना आता पेट्रोल किंवा डिझेल मिळणार नाही

'या' वाहनांना पेट्रोल पंपावर इंधन न देण्याचे आदेश
'या' वाहनांना पेट्रोल पंपावर इंधन न देण्याचे आदेश
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि वाहतूक शिस्त लावण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता फॅन्सी नंबरप्लेट किंवा काळ्या काचा असलेल्या वाहनांना पेट्रोल पंपावर इंधन न देण्याचे आदेश दिले आहेत. ज्या वाहनांना उच्च सुरक्षा नंबरप्लेट (HSRP) नाही, अशा वाहनांना देखील पेट्रोल किंवा डिझेल नाकारण्याच्या स्पष्ट सूचना पोलीस प्रशासनाने पंपचालकांना दिल्या आहेत. या निर्णयाची माहिती देण्यासाठी शहरातील विविध पेट्रोल पंपांवर मोठे फलकही झळकवण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचा वापर गुन्हेगारी कृत्यांसाठी केला जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी हे कठोर धोरण स्वीकारले आहे.
मात्र, पोलिसांचा हा स्तुत्य निर्णय जमिनीवर उतरवताना पेट्रोल पंपांवरील कर्मचाऱ्यांची मोठी दमछाक होत असल्याचे समोर आले आहे. अनेक वाहनचालक या नियमांना जुमानत नसून ते पंपावरील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत आहेत. "आम्ही पैसे देतोय, मग तुम्ही पेट्रोल नाकारणारे कोण?" असा सवाल करत ग्राहक वाद घालत असल्याने कर्मचारी हतबल झाले आहेत. वादाच्या भीतीने अनेक पंपांवर नियम केवळ फलकापुरतेच उरले असून प्रत्यक्षात इंधन पुरवठा सुरूच असल्याचे चित्र दिसत आहे. पंपमालकांनी देखील आपली अडचण व्यक्त करताना सांगितले की, पोलिसांच्या सूचना असल्या तरी आम्हाला ग्राहकांवर थेट कारवाई करण्याचे किंवा त्यांना अडवण्याचे कायदेशीर अधिकार नाहीत, त्यामुळे हा नियम लागू करणे कठीण जात आहे.
advertisement
या संदर्भात वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी स्पष्ट केले आहे की, फॅन्सी नंबरप्लेट आणि काळ्या काचा असलेल्या वाहनांविरुद्धची मोहीम अधिक तीव्र केली जाणार असून लवकरच पंपचालकांना दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी होत आहे की नाही, याची तपासणी केली जाईल. दुसरीकडे, पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रूपारेल यांनी सांगितले की, पोलिसांकडून मिळालेल्या पत्राबाबत असोसिएशनची समिती लवकरच पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून यातील तांत्रिक आणि व्यावहारिक अडचणींवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पिंपरी-चिंचवडकरांनो तुमच्या गाडीला 'अशी' नंबरप्लेट? आता पंपांवर पेट्रोलच मिळणार नाही; पोलिसांचं मोठं पाऊल
Next Article
advertisement
Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement