Kitchen Tips : महिलेने कुकरमध्ये तेलाविना बनवल्या पुऱ्या, खरंच असं होऊ शकतं? व्हिडिओवर कमेंटचा पाऊस

Last Updated:

No oil puri in cooker : अनेकांना पुरी भाजी हा प्रकार प्रचंड आवडतो. महाराष्ट्रातील कोणत्याही शहरात गेलात तर नाष्ट्याच्या ठिकाणी पुरीभाजी नक्की असते. परंतु मस्त फुकलेली आणि कुरकुरीत पुरी बनवणं हे अतिशय कौशल्याचं काम आहे.

व्हिडिओ पाहून सर्वच हैराण
व्हिडिओ पाहून सर्वच हैराण
मुंबई : महाराष्ट्रात कोणताही सण आणि उत्सव असला किंवा छोटा मोठा कार्यक्रम असला तर जेवणात पुरी हमखास बनते. चवदार पुरी भाजी खाणं हा एक अतिशय सुखद अनुभव असतो. अनेकांना पुरी भाजी हा प्रकार प्रचंड आवडतो. महाराष्ट्रातील कोणत्याही शहरात गेलात तर नाष्ट्याच्या ठिकाणी पुरीभाजी नक्की असते. परंतु मस्त फुकलेली आणि कुरकुरीत पुरी बनवणं हे अतिशय कौशल्याचं काम आहे.
पुऱ्या बनवण्यासाठी पीठ मळण्यापासून ते लाटण्यापर्यंत आणि नंतर तेलात तळण्यापर्यंत योग्य कसब असणं आवश्यक असतं. अन्यथा पुऱ्या तेलकट होतात, अर्ध्या कच्च्या राहतात किंवा जास्त तेल पितात. अनेकांची योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने पुऱ्या तळताना फजिती होते. परंतु फेसबूकवर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात अगदी सोप्या पद्धतीने आणि तेही तेलाविना पुऱ्या बनवण्याची आयडिया सांगितली जात आहे.
advertisement
व्हिडिओ पाहून सर्वच हैराण
फेसबूकवरील viyofoood या अकांउटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओत कुकरमध्ये पुऱ्या बनवण्याची आयडिया सांगितली आहे. यात एक महिला कुकरमध्ये पुऱ्या बनवताना दिसत आहे. ती आधी पुऱ्या लाटून घेते. कुकरला आतून तेल लावते आणि नंतर त्यात लाटलेल्या पुऱ्या ठेवते. यानंतर कुकरची शिट्टी काढून घेते आणि थोड्या वेळाने कुकर उघडते. तेव्हा पुऱ्या तयार झालेल्या दिसत आहे. या पुऱ्या अगदी तेलात तळल्यानंतर जशा फुगतात, तशाच फुगलेल्या आणि तयार झालेल्या दिसत आहे.
advertisement
खरंच असं होऊ शकतं?
पुरी तळण्याची ही पद्धत पाहून अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहे. खरंच असं होऊ शकतं का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या व्हिडिओच्या कमेंटमध्ये अनेक प्रतिक्रिया आहेत. यात लोक अनेक प्रश्न विचारत आहे, तर काहींनी याला खोटे प्रयोग म्हटले आहे. एका युजरने 'किती वेळ कुकरमध्ये ठेवायच्या? असा प्रश्न विचारला आहे.
advertisement
दुसऱ्या युजरने 'आम्ही असले खोटे प्रयोग करत नाही. जेव्हा खायच्यात पुऱ्या तेव्हा नीट तळून खातो', असे म्हटले आहे. आणखी एका युजरने 'हे खरच असं होत का, की उगाच व्हिडिओ टाकलाय लाईक कमेंटसाठी' अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर एकाने 'कुकरमध्ये ठेवताना 5 पुऱ्या, कुकर उघडल्यावर 6 पुऱ्या हे कसे काय' अशी कमेंट केली आहे.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kitchen Tips : महिलेने कुकरमध्ये तेलाविना बनवल्या पुऱ्या, खरंच असं होऊ शकतं? व्हिडिओवर कमेंटचा पाऊस
Next Article
advertisement
Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement