दूर्लक्ष करू नका! 11 वी प्रवेशाबाबत महत्त्वाचं अपडेट, 24 मे पासून 'ऑनलाईन रजिस्ट्रेशन' सुरू
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
सर्व विद्यार्थ्यांना 11 वी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे. त्याशिवाय कोणत्याही शिक्षण संस्थेत प्रवेश मिळणार नाही.
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 11 वी प्रवेश प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी केलीय. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दोन टप्प्यांत नोंदणी करावी लागणार आहे. पहिल्या टप्प्याची नोंदणी 24 मे रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होईल. तर दुसऱ्या टप्प्यातील नोंदणी 10 वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सुरू होईल. 11 वी प्रवेशासाठी तीन नियमित फेऱ्या आणि दोन विशेष फेऱ्या होणार आहेत.
advertisement
मुंबई विभागात येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना 11 वी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे. त्याशिवाय कोणत्याही शिक्षण संस्थेत प्रवेश मिळणार नाही. यंदा 'पहले आओ, पहले पाओ' (एफसीएफसी) पद्धतीने प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अंतिम फेरीपर्यंत प्रवेशासाठी वाट पाहू नये, असंही अधिसूचनेत म्हटलंय.
advertisement
इथं होणार ऑनलाईन प्रक्रिया सुरू
दहावीच्या निकालानंतर मुंबई महानगर, पुणे-पिंपरी चिंचवड मनपा, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर महानगर पालिका क्षेत्रात 11 वी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाते.
पहिल्या टप्प्यात काय करायचं?
11 वी प्रवेशासाठी पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी वेबसाईटवर जावून लॉग इन आयडी आणि पासवर्ड तयार करावा लागेल. यामध्ये भरलेल्या माहितीची संबंधित कॉलेज पडताळणी करेल. तर दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीनुसार कॉलेजची निवड करावी लागणार आहे.
advertisement
इथं करा रजिस्ट्रेशन
view commentsपहिल्या टप्प्यात 24 मेपासून ते दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी https://11thadmission.org.in या वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसरा टप्प्यातील नोंदणी सुरू होईल. त्यासाठी http://mumbai.11thadmission.org.in या वेबसाईटला भेट द्यायची आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
May 21, 2024 2:15 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
दूर्लक्ष करू नका! 11 वी प्रवेशाबाबत महत्त्वाचं अपडेट, 24 मे पासून 'ऑनलाईन रजिस्ट्रेशन' सुरू


