कोरेगाव पार्क जमीन घोटाळा, पार्थ पवारांचा व्यवहार रद्दच होणार नाही, समोर आलं मोठं कारण
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
पुण्याच्या कोरेगाव पार्क येथील महार वतनाच्या जमीनीच्या गैरव्यवहार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
गोविंद वाकडे, प्रतिनिधी पिंपरी चिंचवड: पुण्याच्या कोरेगाव पार्क येथील महार वतनाच्या जमीनीच्या गैरव्यवहार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पार्थ पवार यांच्या कंपनीने हा सगळा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्याबाबतचे पत्र पार्थ पवारांची कंपनी अमेडियाकडून निबंधक कार्यालयाला पाठवलं आहे.
पार्थ पवारांनी हा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतला असला तरी हा व्यवहार रद्द होऊ शकणार नाही, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. याचं कारण म्हणजे पार्थ पवारांनी जिच्याकडून ही जमीन खरेदी केली होती, ती शीतल तेजवाणी सध्या फरार आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून तिचा काहीच थांगपत्ता लागत नाही. आरोपी शीतल तेजवाणी आपल्या पतीसह देश सोडून गेल्याचं देखील बोललं जात आहे. आता याच कारणामुळे हा व्यवहार रद्द होत असल्याची तांत्रिक बाब समोर आली आहे.
advertisement
विशेष म्हणजे आज शनिवार असल्याने बावधन परिसरातील दुय्यम निबंधकाच्या कार्यालयाला सुट्टी आहे. मात्र तरीदेखील हे कार्यालय मागील दरवाज्यातून सुरुच ठेवण्यात आलं आहे. पण शीतल तेजवानी गायब असल्यानं पार्थ पवारांचा वादग्रस्त जमीन व्यवहार रद्द होऊ शकत नाही, हे आता स्पष्ट झालं आहे.
संबंधित व्यवहार रद्द करण्यासाठी पुण्यातील बावधन परिसरातील दुय्यम निबंधक कार्यालयात शीतल तेजवाणी आणि अमेडिया कंपनीकडून दिग्विजय पाटलांना समक्ष हजर राहणं बंधनकारक आहे. अशा परिस्थितीत शीतल तेजवानी परदेशात गेली असेल तर ती जोपर्यंत समोर येणार नाही. तो पर्यंत व्यवहार रद्द होणार नाही, त्यामुळे हा व्यवहार रद्द करण्यासाठी मधला मार्ग काय काढला जातो, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 08, 2025 1:52 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
कोरेगाव पार्क जमीन घोटाळा, पार्थ पवारांचा व्यवहार रद्दच होणार नाही, समोर आलं मोठं कारण


