विचार करा! फक्त 1% चार्जिंग असतानाही फोन आणखी 5 मिनिटं कसा चालतो?

Last Updated:
Mobile phone runs longer at 1 percent battery : एक टक्के चार्जिंग राहिली की आता मोबाईल बंद होणार अशी धाकधूक असते. पण इतक्याच चार्जिंगवर मोबाईल बराच वेळ चालतो. ते कसं काय?
1/5
अरे यार माझा फोन आता बंद होईल फक्त 1% चं चार्जिंग आहे, असं आपण बोलतो आणि त्यानंतर आपण पाहतो तर फक्त या एक टक्के बॅटरीवर आपला फोन बराच वेळ चाललेला असतो. म्हणजे 5 टक्क्यांची चार्जिंग पटापट उतरते पण एक टक्क्यावर मात्र फोन बराच वेळ सुरू राहिलेला पाहाल. हे कसं शक्य आहे?

advertisement
2/5
फक्त एक टक्के चार्जिंगवरही इतका वेळ फोन चालणं यामागे विज्ञान आणि मोबाईल बॅटरीचं गुपित दडलं आहे. फोनवर चालू असलेल्या अ‍ॅप्स, स्क्रीन ब्राइटनेस, नेटवर्क सिग्नल, तापमान या गोष्टींमुळेही उरलेल्या चार्जचा वापर वेगवेगळ्या गतीने होतो. उदाहरणार्थ, जर फोन बॅटरी सेव्हर मोडमध्ये असेल, तर तो 1% वरसुद्धा जास्त वेळ चालू राहू शकतो.

3/5
मोबाईलमध्ये लिथियम-आयन (Lithium-ion) प्रकारची बॅटरी असते. या बॅटरीमध्ये चार्ज टक्क्यांमध्ये दाखवला जातो, पण तो आकडा नेहमी अचूक नसतो. फोनमधील बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम (BMS) अंदाजाने टक्केवारी दाखवते. म्हणजेच ती 100% बरोबर मोजमाप नसतं, तर एक कॅल्क्युलेटेड सरासरी असते.

4/5
जेव्हा बॅटरी 1% दाखवते, तेव्हा प्रत्यक्षात तिच्यात थोडा चार्ज शिल्लक असतो, साधारण 3 ते 5% पर्यंत. कारण कंपन्या बॅटरी पूर्णपणे रिकामी होऊ देत नाहीत. पूर्ण डिस्चार्ज झाल्यास बॅटरीचं आयुष्य कमी होतं. त्यामुळे फोन सॉफ्टवेअर 0% दाखवण्यापूर्वीच थोडा चार्ज लपवून ठेवतो. त्यामुळेच 1% दाखवतानाही फोन काही मिनिटं चालतो.

5/5
थोडक्यात सांगायचं, तर मोबाईल 1% चार्ज दाखवतो तेव्हा प्रत्यक्षात थोडा चार्ज अजून उरलेलाच असतो. तो बॅटरीचं रक्षण करण्यासाठी राखून ठेवलेला असतो. म्हणूनच आपला फोन 1% दाखवत असूनही अजून काही मिनिटं चालतो.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement