शाळा अन् मंदिर परिसरात मोठं कांड, ‘स्पा’ सेंटरमध्ये..., पोलीस कारवाई अन् पिंपरीत खळबळ
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Pimpri News: धक्कादायक गोष्ट म्हणजे हा सगळा प्रकार धार्मिक आणि शैक्षणिक ठिकाणी अवैधरित्या सुरू होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत होता.
पुणे: पुण्यामध्ये अनेक ठिकाणी स्पा सेंटर्स आणि लॉजच्या नावाखाली अवैधरित्या वेश्याव्यवसाय सुरू असल्याच्या धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. अशा ठिकाणांवर पोलिसांकडून कडक कारवाई केली जात आहे. अशीच एक घटना पिंपरी-चिंचवड परिसरातून समोर आली आहे. सांगवी आणि हिंजवडी परिसरातील या ठिकाणांवर पोलिसांनी थेट कारवाई केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सार्वजनिक ठिकाणांच्या परिसरात स्पा आणि लॉजिंगच्या नावाखाली बेकायदेशीररित्या वेश्याव्यवसाय सुरू होता. या गैरप्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. सांगवी आणि हिंजवडी परिसरातील दोन स्पा सेंटरसह एका लॉजवर छापा टाकत संबंधित स्पा सेंटर आणि लॉजला एक वर्षासाठी सील करण्यात आले आहे.
advertisement
दोन स्पा सेंटर्स आणि लॉजवर कारवाई
या कारवाईदरम्यान सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जी.एस. स्पा आणि ऑरा थाई स्पा, तसेच हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अतिथी लॉजिंग अँड बोर्डिंग या ठिकाणी छापे टाकण्यात आले. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने संशयित महिला तसेच व्यंकटेश कोदंडबानी, अभिजित लॉरेन्स, प्रवीण बळीराम असटकर, युवराज राजेंद्र पाटील आणि राहुल चव्हाण उर्फ अमित यांच्यावर संबंधित पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
advertisement
धक्कादायक गोष्ट म्हणजे हा सगळा प्रकार धार्मिक आणि शैक्षणिक ठिकाणी अवैधरित्या सुरू होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांनी या प्रकारातील संबंधित आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, सांगवीतील गांगर्डेनगर आणि पिंपळे सौदागर येथील स्पा सेंटर्स तसेच हिंजवडीतील विनोदे वस्ती येथील लॉजमध्ये अवैध वेश्याव्यवसाय सुरू होता. या प्रकारची पोलिसांना खबर लागताच या प्रकरणाचा तपास करत संबंधित ठिकाणी छापे टाकत कडक कारवाई करण्यात आली.
view commentsLocation :
Pimpri Chinchwad,Pune,Maharashtra
First Published :
Jan 03, 2026 12:43 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
शाळा अन् मंदिर परिसरात मोठं कांड, ‘स्पा’ सेंटरमध्ये..., पोलीस कारवाई अन् पिंपरीत खळबळ









