निवडणूक ड्युटीला 'हुलकावणी' देणाऱ्या पिंपरीतील पोलिसांना दणका; रजेवर गेलेल्या 5 जणांवर निलंबनाची कारवाई
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत कर्तव्यावर गैरहजर राहणाऱ्या पोलिसांविरोधात पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी कडक पाऊल उचललं आहे.
पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत कर्तव्यावर गैरहजर राहणाऱ्या पोलिसांविरोधात पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी कडक पाऊल उचललं आहे. निवडणूक काळात अत्यंत महत्त्वाचा बंदोबस्त असतानाही विनापरवाना रजेवर राहिल्याप्रकरणी पोलीस मुख्यालयातील पाच पोलीस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलं आहे.
या पोलिसांवर झाली कारवाई: निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये पोलीस हवालदार संजय केळकर, सागर बाविस्कर, जगन्नाथ शिंदे, प्रतिभा गावडे आणि संतोष जाधव यांचा समावेश आहे. हे सर्व कर्मचारी पोलीस मुख्यालयात नेमणुकीस होते, मात्र मागील काही महिन्यांपासून ते कर्तव्यावर हजर नव्हते.
निवडणूक बंदोबस्ताचा ताण: पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी (१५ जानेवारी) मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्यापूर्वी तळेगाव, आळंदी आणि चाकण नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. सध्या राजकीय नेत्यांचे दौरे आणि संवेदनशील मतदान केंद्र यामुळे पोलीस दलावर कामाचा प्रचंड ताण आहे. अशा परिस्थितीत मनुष्यबळाची कमतरता असताना कर्मचारी विनापरवाना गैरहजर राहिल्याने शिस्तभंगाची ही कारवाई करण्यात आली आहे.
advertisement
इतर ६ पोलिसांनाही दिला इशारा: मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस प्रशासनाने सातत्याने गैरहजर राहणाऱ्या एकूण ११ कर्मचाऱ्यांना हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यापैकी ५ कर्मचारी कामावर परतले, परंतु उर्वरित सहा जणांनी प्रशासनाच्या आदेशाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे, आता या सहा पोलिसांवरही लवकरच निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता पोलीस आयुक्तालयाकडून वर्तवण्यात आली आहे.
advertisement
निवडणूक प्रक्रियेत कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट संकेत या कारवाईतून पोलीस आयुक्तांनी दिला आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 11:33 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
निवडणूक ड्युटीला 'हुलकावणी' देणाऱ्या पिंपरीतील पोलिसांना दणका; रजेवर गेलेल्या 5 जणांवर निलंबनाची कारवाई










