'एक कोटी मला अन् एक कोटी...', जामीन देण्यासाठी 2 कोटींची डील, पुण्यात PSI ला रंगेहाथ अटक

Last Updated:

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेत (EOW) कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) प्रमोद रवींद्र चिंतामणी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रविवारी अटक केली.

News18
News18
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेत (EOW) कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) प्रमोद रवींद्र चिंतामणी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रविवारी अटक केली. एसीबीने ४६ लाख ५० हजार रुपयांची लाच घेताना त्याला रंगेहाथ जेरबंद केलं. अटक केलेल्या एका आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी ही प्रचंड मोठी लाच स्वीकारल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

तक्रारदार वकिलाच्या पक्षकाराविरोधात बावधन पोलीस ठाण्यात फसवणूक आणि कागदपत्रांचे बनावटीकरण (Forgery) या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात पक्षकाराच्या वडिलांना अटक करण्यात आली असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) आहेत. या गुन्ह्याचा तपास पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे होता आणि प्रमोद चिंतामणी हे या प्रकरणाचे तपास अधिकारी होते.
advertisement

दोन कोटींची मागणी, ४६.५० लाखांचा पहिला हफ्ता

तक्रारदारांना या गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि त्यांच्या वडिलांच्या जामीन मिळवून देण्यासाठी उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी यांनी थेट दोन कोटी रुपयांची मागणी केली. विशेष म्हणजे, या रकमेपैकी एक कोटी रुपये स्वतःसाठी आणि उर्वरित एक कोटी रुपये वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी असल्याची माहिती त्याने तक्रारदारांना दिली.
चिंतामणी यांच्या या अवाढव्य मागणीमुळे हतबल झालेल्या तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) धाव घेतली आणि याबाबत तक्रार दिली. 'एसीबी'च्या पथकाने तक्रारीची सत्यता पडताळली.
advertisement

रास्ता पेठेत सापळा

त्यानंतर 'एसीबी'च्या पथकाने पुणे शहरातील रास्ता पेठ भागातील उंटाड्या मारुती मंदिराजवळ सापळा रचला. तक्रारदारांकडून लाचेच्या मागणीनुसार, पहिल्या हप्त्यापोटी ४६ लाख ५० हजार रुपये स्वीकारताना उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी यांना 'एसीबी'ने तत्काळ ताब्यात घेतले आणि त्यांना अटक करण्यात आली.
चिंतामणी यांच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्याने एवढ्या मोठ्या रकमेची लाच मागणे आणि ती स्वीकारताना रंगेहाथ पकडले जाणे, यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली असून, या प्रकरणाचा अधिक तपास 'एसीबी' करत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
'एक कोटी मला अन् एक कोटी...', जामीन देण्यासाठी 2 कोटींची डील, पुण्यात PSI ला रंगेहाथ अटक
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement