Police Bharati 2025: लागा तयारीला! पिंपरी-चिंचवड पोलीस दलात मेगाभरती, अर्ज आणि वेळापत्रक संपूर्ण माहिती
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
Police Bharati 2025: खाकी वर्दीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पिंपरी चिंचवड पोलीस दलात मेगाभरती होत असून ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत.
पिंपरी: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पिंपरी चिंचवड पोलीस दलामध्ये 322 पोलीस शिपायांची भरती केली जाणार आहे. 29 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये ऑनलाईन स्वरूपात या भरतीचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत या भरतीमध्ये सर्वसाधारण उमेदवारांसाठी 97 पदे, महिला 97 पदे, खेळाडू 16 पदे, प्रकल्पग्रस्त 16 पदे, भूकंपग्रस्त 6 पदे, माजी सैनिक 48 पदे, अंशकालीन पदवीधर 16 पदे, पोलीस पाल्य 16 पदे तर अनाथ साठी 3 पदे भरती करण्यात येणार आहेत.
advertisement
उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध आहे. राज्यातील पोलिसांमधील सर्व घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित केली जाणार आहे, त्यामुळे उमेदवार संपूर्ण महाराष्ट्रभरातून एकाच घटकात अर्ज करू शकतात. उमेदवाराकडून चुकीची माहिती देण्यात आली तर उमेदवारी रद्द होऊ शकते. उमेदवारांनी लेखी परीक्षेत 40 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे, तिची आणि चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारावर उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे.
advertisement
असे असेल परीक्षेचे स्वरूप 
या भरती प्रक्रियेमध्ये प्रथमतः उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल. त्यामध्ये किमान 50% गुण मिळवणाऱ्या उमेदवाराकडून 1 ते 100 प्रमाणात उमेदवारांची एकूण 100 गुणांची परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांनी लेखी परीक्षेत एकूण 40% गुण मिळवणे अपेक्षित आहे.
18 ते 28 गटातील उमेदवारांना करता येणार अर्ज
धार्मिक आणि लेखी चाचणी मधील गुणांच्या आधारावर उमेदवारांची एक गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. उमेदवारांची मूळ कागदपत्रे पूर्णपणे पडताळणी करण्यात येतील. कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी करण्यात येईल. यानंतर अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल. पोलीस भरतीच्या अर्जासाठी उमेदवार दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. वय वर्ष 18 ते 28 या वयोगटातील उमेदवारांना पोलीस भरतीसाठी अर्ज करता येईल.
view commentsLocation :
Pimpri Chinchwad,Pune,Maharashtra
First Published :
October 31, 2025 8:09 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Police Bharati 2025: लागा तयारीला! पिंपरी-चिंचवड पोलीस दलात मेगाभरती, अर्ज आणि वेळापत्रक संपूर्ण माहिती


