Pune Gramin Police Bharti: पुणे ग्रामीण पोलीस दलामध्ये भरती सुरू, कोणकोणते पदे रिक्त; अर्जाची Detail बातमीमध्ये...
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Pune Gramin Police Bharti 2025: महाराष्ट्र पोलिस विभागामध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे ग्रामीण पोलिस दलामध्ये नोकरभरती केली जाणार आहे. यामध्ये पोलिस शिपाई आणि पोलिस शिपाई चालक पदांसाठी भरती प्रक्रिया होत आहे.
महाराष्ट्र पोलिस विभागामध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे ग्रामीण पोलिस दलामध्ये नोकरभरती केली जाणार आहे. यामध्ये पोलिस शिपाई आणि पोलिस शिपाई चालक पदांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. 28 ऑक्टोबरपासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. भरती प्रक्रियेच्या शेवटच्या तारखेबद्दल अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही. पुणे ग्रामीणमध्ये पोलिस अधिक्षक पदासाठी 2024- 25 या वर्षासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पुणे ग्रामीण पोलीस दलामध्ये, एकूण 72 जागांसाठी नोकरभरती केली जाणार आहे. त्यामध्ये पोलिस शिपाई पदासाठी 69 जागांसाठी तर पोलिस शिपाई चालक पदासाठी 3 जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. पोलीस शिपाई पदासाठीची भरती महाराष्ट्र पोलीस शिपाई (भरती) नियम, 2011 आणि त्यानंतरच्या शासकीय सुधारणांनुसार केली जात आहे. पोलीस शिपाई चालक पदासाठीची भरती महाराष्ट्र सहायक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक आणि पोलीस शिपाई चालक (भरती) नियम, 2019 आणि त्यानंतरच्या सुधारणांनुसार केली जाईल.
advertisement
पोलिस शिपाई पदासाठी अनुसूचित जाती- जमाती, भटक्या जमाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड), विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास वर्ग, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक आणि अराखीव यांसाठी एकूण 69 पदांवर भरती केली जात आहे. आरक्षण प्रवर्गानुसार ही भरती केली जाणार आहे. आरक्षण प्रवर्गानुसार, सर्वसाधारण, महिला, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अर्धवेळ पदवीधर, पोलीस पाल्यांसाठी आणि गृहरक्षकांसाठीही जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच, एकूण रिक्त जागांच्या 1% जागा 'अनाथ' प्रवर्गासाठी असतील.
advertisement

Pune Gramin Police Bharti 2025
पोलीस शिपाई चालक पदासाठीच्या जाहिरातीनुसार, 3 जागांसाठी भरती केली जाईल. या जागांचेही आरक्षण प्रवर्गानुसार वर्गीकरण करण्यात आले आहे. इतर मागास वर्ग आणि अराखीव अशा दोन प्रवर्गामध्येच तीन जागांवर नोकरभरती केली जाणार आहे. या दोन्हीही प्रवर्गामध्ये सर्वसाधारण उमेदवारांसाठीच नोकरभरती केली जात आहे. इतरत्र उमेदवारांसाठी पोलीस शिपाई चालक पदासाठी नोकरभरती केली जाणार आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये जर भरती प्रक्रियेदरम्यान कोणीही पैशांची मागणी किंवा इतर कोणत्याही गोष्टीची मागणी जर केली, तर उमेदवारांनी तात्काळ दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो, पुणे येथे संपर्क साधावा.
advertisement

यासाठी दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो, पुणे यांनी संपर्क क्रमांक सुद्धा देण्यात आला आहे. (020) 26122134 / 26132802/ 1064 या क्रमांकावर अर्जदारांनी संपर्क साधावा. भरती प्रक्रियेदरम्यान जर अर्जदारांना काही अडचणी किंवा प्रश्न असल्यास, कार्यालयीन वेळेत खालील मदत क्रमांकांवर संपर्क साधावा. पोलीस अधीक्षक कार्यालय, पुणे ग्रामीण यांचा दूरध्वनी क्रमांक 020-25657878 आहे. तसेच, पोलीस उपविभागीय अधिकारी, मुख्यालय, पुणे ग्रामीण यांचा दूरध्वनी क्रमांक 020-25651127 आहे.
advertisement
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी एकदा आवश्य जाहिरातीची PDF वाचावी. आपल्या पदाप्रमाणे आवश्यक लागणारी कागदपत्रे तयार ठेवावीत. अर्जामध्ये कोणतीही चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद ठरवला जाऊ शकतो. भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यांची माहिती वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे उमेदवारांनी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्यावी.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 29, 2025 4:29 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Gramin Police Bharti: पुणे ग्रामीण पोलीस दलामध्ये भरती सुरू, कोणकोणते पदे रिक्त; अर्जाची Detail बातमीमध्ये...


