माझा बाप बिल्डर असता तर...; पुण्यात Porsche अपघात झाला तिथंच निबंध लेखन स्पर्धा
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
पुण्यात काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी अपघातस्थळीच निबंध स्पर्धेचं आय़ोजन केलं. माझा बाप बिल्डर असता तर..., अश्विनी आणि अनिशचे मारेकरी कोण? या विषयावर निबंध स्पर्धा घेतली गेली.
पुणे : पुण्यात कल्याणीनगरमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी बिल्डरच्या अल्पवयीन मुलाला निबंध लिहिण्याच्या आणि आरटीओसोबत वाहतूक नियंत्रण करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला गेला होता. आता पुण्यात काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी अपघातस्थळीच निबंध स्पर्धेचं आय़ोजन केलं. माझा बाप बिल्डर असता तर..., अश्विनी आणि अनिशचे मारेकरी कोण? या विषयावर निबंध स्पर्धा घेतली गेली. विशेष म्हणजे या निबंध स्पर्धेच्या ठिकाणी 60 ते 70 पोलिस बंदोबस्ताला आहेत.
पोर्शे कार अपघात स्थळी निबंध स्पर्धेत अनेकांनी सहभाग घेतला. या निबंध स्पर्धेत प्रथम बक्षीस ११ हजार १११ रुपये इतकं ठेवलं होतं. अल्पवयीन आरोपीला बाल हक्क न्यायालयाने जामीन मंजूर केला तेव्हा ३०० शब्दात अपघात विषयावर निबंध लिहण्याची अट घातली होती. यावरून बालहक्क न्यायालयासह पोलिसांच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले. शेवटी दबाव वाढल्यानंतर अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी केली गेली.
advertisement
व्यवस्थेची चिड येत असेल तर घरी बसून संताप करण्यापेक्षा लोकशाही मार्गाने आपला विरोध नोंदवा..
जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा.#justicefor_anishashvini #puneaccident #dhangekar_pattern pic.twitter.com/YVFdkJceHL
— Ravindra Dhangekar Official (@DhangekarINC) May 25, 2024
पोर्शे कार अपघात प्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आलीय. यामध्ये मुलाचे वडील आणि आजोबांचासुद्धा समावेश आहे. वडिलांनी मुलगा अल्पवयीन असूनही त्याला कार चालवण्यास दिल्याचा आरोप आहे. तर आजोबांनी अपघातानंतर चालकाला डांबून ठेवल्याचा आणि त्याला गुन्हा स्वत:च्या नावावर घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे.
advertisement
सीसीटीव्ही फूटेजची तपासणी
पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तब्बल 100 पेक्षा अधिक सी सी टिव्ही कॅमेरा फुटेजची तपासणी करण्यात आलीय. अग्रवाल यांचे निवस्थान, कोझी पब, ब्लॅक हॉटेल तसचं अपघात स्थळ अशा सगळ्या ठिकाणचे फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. ज्या मार्गावरून पोर्शे गाडी फिरवण्यात आली, त्या मार्गावरील सर्व सी सी टिव्ही फुटेज ची पडताळणी केली जात आहे. गुन्हे शाखेच्या हाती यातून अनेक धागेदोरे लागण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 26, 2024 11:47 AM IST