पुण्याच्या खड्ड्यांनी राष्ट्रपतीही नाराज, थेट पुणे पोलिसांना धाडलं पत्र
- Published by:Shreyas
Last Updated:
पुण्याच्या खड्ड्यांमुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूही नाराज झाल्या आहेत, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 26 तारखेच्या पुणे दौऱ्याआधी शहरातील खड्डे बुडवण्यासाठी पुणे पोलिसांनी महापालिकेला पत्र लिहिलं आहे.
चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी
पुणे : पुण्याच्या खड्ड्यांमुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूही नाराज झाल्या आहेत, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 26 तारखेच्या पुणे दौऱ्याआधी शहरातील खड्डे बुडवण्यासाठी पुणे पोलिसांनी महापालिकेला पत्र लिहिलं आहे. पुण्यातील खड्ड्यांचा फटका देशाच्या राष्ट्रपतींना बसला आहे. पुण्यातल्या खड्ड्यांबाबत राष्ट्रपती कार्यालयाने नाराजी व्यक्त केली आहे.
2 आणि 3 सप्टेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुणे दौऱ्यावर होत्या. पुण्यातील राजभवनला त्यांचा मुक्काम होता. तिथून कार्यक्रमांसाठी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी जातांना राष्ट्रपतींच्या ताफ्यातील वाहनांना पुण्यातील खड्ड्यांचा मोठा त्रास झाला. राष्ट्रपती कार्यालयाने ही नाराजी पुणे पोलीसांना कळवली. त्यामुळे आता 26 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार असल्यानं रस्त्यांवरील हे खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावेत, यासाठी पुणे पोलिसांनी पुणे महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलंय.
advertisement
राष्ट्रपती कार्यालयाने व्यक्त केलेली नाराजी पाहता पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास महापालिकेला सांगण्यात आलं आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 21, 2024 11:29 PM IST