Pune Accident: संसाराची स्वप्नं दीड वर्षातच विखुरली! पुण्यातील ती रात्र राजासाठी शेवटची ठरली, उड्डाणपुलावर भयानक घडलं

Last Updated:

पुणे शहरातील रामटेकडी परिसरातील किर्लोस्कर रेल्वे उड्डाणपुलावर सोमवारी रात्री एक भीषण अपघात घडला. रस्ता ओलांडणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाला कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या बसने जोरदार धडक दिली

अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
पुणे : पुणे शहरातील रामटेकडी परिसरातील किर्लोस्कर रेल्वे उड्डाणपुलावर सोमवारी रात्री एक भीषण अपघात घडला. रस्ता ओलांडणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाला कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या (KSRTC) बसने जोरदार धडक दिली. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, वानवडी पोलिसांनी एसटी चालकाला अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
मयत तरुणाचं नाव राजा यल्लापा लाकडे (वय २५, रा. वैदुवाडी, हडपसर) असे आहे. सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास राजा लाकडे रामटेकडी येथील किर्लोस्कर उड्डाणपुलावरून रस्ता ओलांडत होता. याचवेळी कर्नाटकहून सोलापूरच्या दिशेने जाणारी भरधाव एसटी बस तिथे आली. उड्डाणपुलावर अंधार असल्याने आणि वाहनांचा वेग जास्त असल्याने चालकाला रस्ता ओलांडणारा राजा दिसला नाही आणि बसने त्याला जोरदार धडक दिली.
advertisement
दीड वर्षांपूर्वीच झालं होतं लग्न: अपघात इतका भीषण होता की, एसटी बसचे चाक राजाच्या अंगावरून गेलं. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेऊन राजाला गाडीखालून बाहेर काढलं आणि शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केलं. राजा याचं अवघ्या दीड वर्षांपूर्वीच लग्न झालं होतं. त्याच्या निधनामुळं वैदुवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.
advertisement
वानवडी पोलिसांनी याप्रकरणी एसटी चालक आमल्या आयप्पा क्रियाळ (वय ५८, रा. शहापूर, कर्नाटक) याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. उड्डाणपुलावरील अंधार आणि पादचाऱ्यांसाठी रस्ता ओलांडण्याच्या सोयीचा अभाव यांमुळे हा बळी गेल्याची चर्चा घटनास्थळी नागरिक करत होते. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Accident: संसाराची स्वप्नं दीड वर्षातच विखुरली! पुण्यातील ती रात्र राजासाठी शेवटची ठरली, उड्डाणपुलावर भयानक घडलं
Next Article
advertisement
BMC Mayor Eknath Shinde:  न सांगता, न कळवता शिंदेंनी गाठली दिल्ली! भाजप नेत्यांसोबतच्या गुप्त भेटीने मुंबईच्या महापौरपदाचा सस्पेन्स वाढला!
न सांगता, न कळवता शिंदेंनी गाठली दिल्ली! भाजप नेत्यांसोबतच्या गुप्त भेटीने मुंबई
  • भाजप आणि शिवसेना शिंदे गटात सत्ता वाटपावरून चढाओढ सुरू असल्याचे चित्र

  • मुंबईच्या महापौराबाबतचा निर्णय दिल्लीतून होणार असल्याने घडामोडींना वेग

  • शिंदे गट-भाजपच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोड घडली आहे.

View All
advertisement