बाबो! एका व्यक्तीकडे मुंबईसारखी 4 शहरं राहतील इतकी जमीन; कोण आहे मालक, कुठे आहे, किंमत किती?

Last Updated:
World Biggest Land Owner : आजकाल जमिनीत पैसे गुंतवणं हा एक अतिशय फायदेशीर पर्याय मानला जातो. जगातील सर्वात मोठ्या जमिनीच्या तुकड्यासाठी एक करार झाला आहे. खरेदीदाराने खूप पैसे खर्च केले आहेत.
1/5
भारतातील लोकांना प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायला आवडते. लोक त्यांच्या प्रॉपर्टीनुसार जमीन खरेदी करतात. ज्यांची किंमत लाखोंच्या घरात असते. पण जगातील सगळ्यात मोठी आणि महागडी जमीन कोणती असेल? याचा तुम्ही विचार केला आहे. आता जगातील सर्वात चर्चेत असलेला जमीन खरेदीचा करार समोर आला आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा जमीन विक्रीचा करार असल्याचं मानलं जातं.

advertisement
2/5
या जमिनीचं एकूण क्षेत्रफळ अंदाजे 916000 एकर आहे, जे न्यू यॉर्क शहराच्या आकाराच्या चार पट आणि रोड आयलंड राज्यापेक्षा जास्त आहे. न्यूयॉर्कचं क्षेत्रफळ 778.2 km2 तर मुंबईचं क्षेत्रफळ 603.4 km² म्हणजे मुंबईसारखी 4 पेक्षा जास्त शहरं या जमिनीवर मावतील इतकी जागा. या रँचची लिस्टिंग किंमत 79.5 दशलक्ष डॉलर म्हणजे अंदाजे 670 कोटी रुपये होती आणि 14 जानेवारी 2026 रोजी हा करार अंतिम झाला.

3/5
आता हे ठिकाण आहे हे कुठे? तर अमेरिकेच्या वायोमिंग राज्यातील हे पाथफाइंडर रँच. जे रॉकी पर्वतांमधील चार काउंटींमध्ये पसरलेले आहे, जे राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या 1% पेक्षा जास्त भाग व्यापतं. त्यात स्वीटवॉटर नदी, पेड्रो, फेरिस, सेमिनोल आणि ग्रीन माउंटन रांगांचा 20 मैलांपेक्षा जास्त भाग समाविष्ट आहे. ऐतिहासिक इंडिपेंडन्स रॉक देखील इथं आहे, जो ओरेगॉन, मॉर्मन, पोनी एक्सप्रेस आणि कॅलिफोर्निया ट्रेल्सवर आहे. हे एक कार्यरत गुरांचं रँच आहे जे 90000 हून अधिक गुरेढोरे सामावू शकतं.

4/5
खरेदीदाराची ओळख अनेक महिन्यांपर्यंत गूढ राहिली, ज्यामुळे सोशल मीडियावर अफवा पसरल्या. पण आता या जमिनीचा खरेदीदार क्रिस्टोफर रॉबिन्सन असल्याची माहिती आहेत. तो समिट काउंटी काऊन्सिल सदस्य आणि एनसाइन ग्रुप एलसीचा सीईओ आहे. रॉबिन्सन म्हणाले की ही खरेदी केवळ रँकिंग किंवा स्केलबद्दल नव्हती, तर जमीन आणि पाण्यावरील त्यांचं प्रेम होतं. त्यांना संवर्धन आणि पशुपालन दोन्हीमध्ये रस आहे. या रँचमध्ये चार वेगवेगळ्या मालमत्ता आहेत. डीड केलेलं क्षेत्र 99188 एकर आहे, उर्वरित भाडेपट्ट्याने दिलं आहे.

5/5
या करारापूर्वी रॉबिन्सन आणि त्यांची फॅमिली जमीन मालकीत लँड रिपोर्ट मॅगझिनच्या टॉप 100 मध्ये 31 व्या क्रमांकावर होती. पाथफाइंडर रँचसह आता त्यांची एकूण जमीन 470000 एकरांपेक्षा जास्त होऊ शकते, ज्यामुळे ते यादीत दहाव्या स्थानांवर पोहोचतील आणि अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस जे 462000 एकर जमिनीचे मालक आहेत त्यांनाही मागे टाकतील. (सर्व फोटो : न्यूयॉर्क पोस्ट)

BMC Mayor Eknath Shinde:  न सांगता, न कळवता शिंदेंनी गाठली दिल्ली! भाजप नेत्यांसोबतच्या गुप्त भेटीने मुंबईच्या महापौरपदाचा सस्पेन्स वाढला!
न सांगता, न कळवता शिंदेंनी गाठली दिल्ली! भाजप नेत्यांसोबतच्या गुप्त भेटीने मुंबई
  • भाजप आणि शिवसेना शिंदे गटात सत्ता वाटपावरून चढाओढ सुरू असल्याचे चित्र

  • मुंबईच्या महापौराबाबतचा निर्णय दिल्लीतून होणार असल्याने घडामोडींना वेग

  • शिंदे गट-भाजपच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोड घडली आहे.

View All
advertisement