Mumbai News: ताडदेव ते मुंबई सेंट्रल सुसाट, डेडलाईनच्या 4 महिने आधीच पूर्ण झालं ‘या’ उड्डाणपुलाचं काम

Last Updated:

Mumbai News: ब्रिटिशकालीन सुमारे 130 वर्षे जुना बेलासिस पूल धोकादायक ठरल्याने तो पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Mumbai News: ताडदेव ते मुंबई सेंट्रल सुसाट, डेडलाईनच्या 4 महिने आधीच पूर्ण झालं ‘या’ उड्डाणपुलाचं काम
Mumbai News: ताडदेव ते मुंबई सेंट्रल सुसाट, डेडलाईनच्या 4 महिने आधीच पूर्ण झालं ‘या’ उड्डाणपुलाचं काम
मुंबई: दक्षिण मुंबईतील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला बेलासिस उड्डाणपूल ठरलेल्या मुदतीच्या चार महिने आधीच पूर्ण झाला आहे. ताडदेव–नागपाडा आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या या पुलामुळे गेल्या दोन वर्षांपासून त्रस्त असलेल्या वाहनचालकांना आणि स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.
ब्रिटिशकालीन सुमारे 130 वर्षे जुना बेलासिस पूल धोकादायक ठरल्याने तो पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर नव्या उड्डाणपुलाच्या पुनर्बाधणीसाठी सप्टेंबर 2024 मध्ये कार्यादेश देण्यात आला. प्रत्यक्ष बांधकामास 1 ऑक्टोबर 2024 रोजी सुरुवात झाली. अत्यंत कमी कालावधीत हे काम पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या पूल विभागाने आणि रेल्वे विभागाच्या अभियंत्यांनी समन्वयाने विशेष प्रयत्न केले.
advertisement
बांधकामादरम्यान अनेक अडचणींवर मात करावी लागली. वीजवाहिन्यांचे स्थलांतरण, पुलाच्या मार्गातील 13 बांधकामे हटविणे व संबंधित रहिवाशांना पर्यायी निवास देणे, एका सोसायटीची सीमाभिंत हटविणे, पावसाळ्यातही काम सुरू ठेवणे तसेच न्यायालयीन खटल्यांचा सामना करणे अशी विविध आव्हाने होती. मात्र नियोजनबद्ध कामकाजामुळे पूल वेळेत पूर्ण करण्यात यश आले.
advertisement
नवीन बेलासिस उड्डाणपुलाची एकूण लांबी 333 मीटर असून पूर्वेकडील भाग 138.39 मीटर आणि पश्चिमेकडील भाग 157.39 मीटर लांबीचा आहे. पुलावरील वाहतूक मार्गाची रुंदी 7 मीटर असून दोन्ही बाजूंना पुरेशा रुंदीचे पदपथ उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
हा पूल जहांगीर बोमन बेहराम मार्गावर असून तो मुंबई सेंट्रल, नागपाडा आणि ताडदेव भागांना रेल्वे मार्गावरून पूर्व–पश्चिम जोडतो. पूल सुरू झाल्यानंतर दादासाहेब भडकमकर मार्ग, पठे बापूराव मार्ग तसेच महालक्ष्मी स्थानक पुलावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
advertisement
पुलाची अंतिम कामे 6 जानेवारी रोजी पूर्ण झाली असून भार चाचणी, संरचनात्मक स्थिरता व सुरक्षा प्रमाणपत्रे मिळाली आहेत. रेल्वे विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळताच वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: ताडदेव ते मुंबई सेंट्रल सुसाट, डेडलाईनच्या 4 महिने आधीच पूर्ण झालं ‘या’ उड्डाणपुलाचं काम
Next Article
advertisement
BMC Mayor Eknath Shinde:  न सांगता, न कळवता शिंदेंनी गाठली दिल्ली! भाजप नेत्यांसोबतच्या गुप्त भेटीने मुंबईच्या महापौरपदाचा सस्पेन्स वाढला!
न सांगता, न कळवता शिंदेंनी गाठली दिल्ली! भाजप नेत्यांसोबतच्या गुप्त भेटीने मुंबई
  • भाजप आणि शिवसेना शिंदे गटात सत्ता वाटपावरून चढाओढ सुरू असल्याचे चित्र

  • मुंबईच्या महापौराबाबतचा निर्णय दिल्लीतून होणार असल्याने घडामोडींना वेग

  • शिंदे गट-भाजपच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोड घडली आहे.

View All
advertisement