Mumbai AC Local: महालक्ष्मी, लोअर परेल, प्रभादेवीवरुन गारेगार प्रवास करता येणार, परेच्या नव्या एसी लोकलचं टाईमटेबल...
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai AC local: पश्चिम रेल्वेने ही सेवा मुंबईकरांच्या वाढत्या मागणीचा विचार करून सुरू केली आहे. त्यामुळे प्रवास गारेगार आणि आरामदायी होईल.
मुंबई : मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक आरामदायी आणि गारेगार होणार आहे. यासाठी पश्चिम रेल्वेने मोठा निर्णय घेतला असून आता मुंबई उपनगरीय रेल्वेवरील एसी लोकल सेवांची संख्या 109 वरून वाढवून 121 करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना महालक्ष्मी, लोअर परेल, प्रभादेवीवरून वातानुकूल, सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे.
पश्चिम रेल्वेने एसी लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळेत प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गाला, विद्यार्थ्यांना तसेच महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. नवीन वाढीव एसी लोकल सेवा 26 जानेवारीपासून प्रभावीपणे सुरू होणार आहेत.
एसी लोकल सेवांमध्ये झालेल्या वाढीमुळे चर्चगेट–विरार मार्गावरील प्रवास अधिक सुलभ होणार असून, वेळेची बचत आणि प्रवासातील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. पश्चिम रेल्वेने ही सेवा मुंबईकरांच्या वाढत्या मागणीचा विचार करून सुरू केली असल्याचे सांगितले आहे.
advertisement
उपनगरांकडून चर्चगेटकडे जाणाऱ्या एसी लोकल फेऱ्या (अप मार्ग)
1) गोरेगाव ते चर्चगेट ही धीमी एसी लोकल सकाळी 05:14 वाजता गोरेगावहून सुटून 06:11 वाजता चर्चगेट येथे पोहोचेल. यानंतर चर्चगेटकडे जाणारी जलद एसी लोकल सकाळी 07:25 वाजता मार्गस्थ होऊन 08:20 वाजता चर्चगेटला पोहोचणार आहे.
advertisement
2) विरार ते चर्चगेट ही जलद एसी लोकल 10:08 वाजता विरारहून सुटून 11:20 वाजता चर्चगेट येथे दाखल होईल.
3) बोरिवली ते चर्चगेट ही जलद एसी लोकल 12:44 वाजता बोरिवलीहून निघून 13:48 वाजता चर्चगेटला पोहोचणार आहे.
4) दुपारनंतर विरार ते भाईंदर ही धीमी एसी लोकल 15:45 वाजता विरारहून सुटून 17:09 वाजता भाईंदर येथे पोहोचेल.
advertisement
5) संध्याकाळच्या वेळेत गोरेगाव ते चर्चगेट ही धीमी एसी लोकल 19:06 वाजता गोरेगावहून निघून 20:01 वाजता चर्चगेटला पोहोचणार आहे.
चर्चगेटहून उपनगरांकडे जाणाऱ्या एसी लोकल फेऱ्या (डाऊन मार्ग)
1) चर्चगेट ते बोरिवली ही धीमी एसी लोकल सकाळी 06:14 वाजता चर्चगेटहून सुटून 07:19 वाजता बोरिवली येथे पोहोचेल.
2) त्यानंतर चर्चगेट ते विरार ही जलद एसी लोकल 08:27 वाजता सुटून 09:51 वाजता विरार स्थानकावर पोहोचणार आहे.
advertisement
3) पुढे चर्चगेट ते भाईंदर ही जलद एसी लोकल 11:30 वाजता चर्चगेटहून निघून 12:31 वाजता भाईंदर येथे पोहोचेल.
4) दुपारच्या वेळेत चर्चगेट ते विरार ही धीमी एसी लोकल 13:52 वाजता सुटून 15:36 वाजता विरार येथे दाखल होईल.
5) संध्याकाळी चर्चगेट ते गोरेगाव ही धीमी एसी लोकल 17:57 वाजता चर्चगेटहून निघून 18:51 वाजता गोरेगाव येथे पोहोचेल.
advertisement
6) दिवसातील शेवटची एसी लोकल देखील चर्चगेट ते गोरेगाव दरम्यान धावणार असून ती 20:07 वाजता चर्चगेटहून सुटून 21.02 वाजता गोरेगावला पोहोचेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 21, 2026 10:33 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai AC Local: महालक्ष्मी, लोअर परेल, प्रभादेवीवरुन गारेगार प्रवास करता येणार, परेच्या नव्या एसी लोकलचं टाईमटेबल...









