advertisement

Health Tips : सतत बसून राहिल्यानं वाढतोय वृद्धत्वाचा धोका, शरीरावर होतात दीर्घकालीन परिणाम, भारतात वाढतंय गंभीर आजारांचं प्रमाण

Last Updated:

दिवसाचा बराचसा वेळ खुर्चीत बसून घालवणं, ऑफिस असो किंवा घरून काम करणं, तासनतास एकाच जागी बसून राहणं आपल्या प्रकृतीसाठी वाईट ठरु शकतं. डॉक्टरांच्या मते, ही सवय आपल्या सांध्यांसाठी वाईट आहे. जास्त वेळ बसून राहिल्यानं, विशेषतः गुडघे, पाठ आणि मानेमधे अकाली कमकुवतपणा जाणवू शकतो.

News18
News18
मुंबई : घरी किंवा ऑफिसमधे बसून काम करत असाल तर ही माहिती पूर्ण वाचा. बसून काम तर सगळेच करतात पण बराच वेळ एका ठिकाणी बसून काम करत असाल तर ही धोक्याची घंटा आहे.
दिवसाचा बराचसा वेळ खुर्चीत बसून घालवणं, ऑफिस असो किंवा घरून काम करणं, तासनतास एकाच जागी बसून राहणं आपल्या प्रकृतीसाठी वाईट ठरु शकतं. डॉक्टरांच्या मते, ही सवय आपल्या सांध्यांसाठी वाईट आहे. जास्त वेळ बसून राहिल्यानं, विशेषतः गुडघे, पाठ आणि मानेमधे अकाली कमकुवतपणा जाणवू शकतो.
आपल्या शरीरात अंदाजे तीनशे साठ सांधे असतात. हे सांधे आपल्याला चालण्यासाठी, वाकण्यासाठी, वळण्यासाठी आणि दैनंदिन कामांसाठी उपयोगाचे असतात. तासनतास एकाच जागी बसून राहिल्यानं, सांधे आखडू लागतात.
advertisement
रक्ताभिसरणही मंदावतं. हळूहळू वेदना, सूज आणि आखडणं असे प्रकार सुरू होतात. पूर्वी, या समस्या वृद्ध लोकांमधे अधिक सामान्य होत्या, पण आता तरुणांमधेही गुडघे आणि पाठ दुखण्याच्या तक्रारी वाढल्यात.
advertisement
सॉलिड मास रेशियो - याचा अर्थ शरीरात स्नायूंचं योग्य प्रमाण राखणं. आपण कमी हालचाल केली आणि जास्त वेळ बसून राहिलो, तर आपले स्नायू कमकुवत होऊ लागतात. स्नायू कमकुवत होतात, तेव्हा ते सांध्यांना योग्य आधार देऊ शकत नाहीत. यामुळे सांध्यांवर अधिक दाब पडतो आणि त्यांची वृद्धत्वाची म्हणजे ताकद कमी होण्याची प्रक्रिया वेगानं होते.
advertisement
भारतात ही समस्या झपाट्यानं वाढत आहे. नोकरदार लोक, विशेषतः शहरांमधील, सकाळपासून संध्याकाळपर्यंत संगणकासमोर तासन्तास घालवतात. ही वाढती समस्या पाहून, सरकारनं जीवनशैलीशी संबंधित आजारांच्या संशोधन आणि प्रतिबंधावर अंदाजे 4800 कोटी रुपये खर्च करण्याची योजना आखली आहे. सांधे, हाडं आणि स्नायू यांच्याशी संबंधित समस्या समजून घेणं आणि त्यावर वेळेवर उपाय शोधणं हा यामागील उद्देश आहे.
advertisement
डॉक्टरांच्या मते, सतत बसून राहणं हे शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. सुरुवातीला कदाचित फारसा फरक जाणवणार नाही, पण कालांतरानं ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते.
advertisement
हे टाळण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. दर तीस ते चाळीस मिनिटांनी खुर्चीवरून उठा, थोडं चाला किंवा हलका व्यायाम करा. लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा. दररोज किमान तीस मिनिटं चालायला किंवा हलका व्यायाम करायला विसरू नका. लक्षात ठेवा, शरीराला हालचाल आवडते. जितके जास्त सक्रिय राहाल, तितका जास्त काळ सांधे निरोगी आणि मजबूत राहतील.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips : सतत बसून राहिल्यानं वाढतोय वृद्धत्वाचा धोका, शरीरावर होतात दीर्घकालीन परिणाम, भारतात वाढतंय गंभीर आजारांचं प्रमाण
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement