advertisement

Pune News: पुणेकरांनो लक्ष द्या! पुणे विद्यापीठाकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग 'या' वेळेत महिनाभरासाठी बंद, काय आहे कारण?

Last Updated:

कृषी महाविद्यालयासमोर असलेल्या उड्डाणपुलाच्या देखभाल-दुरुस्तीचे काम पुणे महानगरपालिकेने हाती घेतले आहे

कृषी महाविद्यालयासमोर असलेल्या उड्डाणपुलाचं काम (प्रतिकात्मक फोटो)
कृषी महाविद्यालयासमोर असलेल्या उड्डाणपुलाचं काम (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : पुण्यातील अत्यंत वर्दळीच्या गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. कृषी महाविद्यालयासमोर असलेल्या उड्डाणपुलाच्या देखभाल-दुरुस्तीचे काम पुणे महानगरपालिकेने हाती घेतले आहे. या कामासाठी शनिवार, २८ फेब्रुवारीपासून ते २७ मार्चपर्यंत पुलावरील एक मार्गिका रात्रीच्या वेळी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
काय आहे नवीन बदल?
महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उड्डाणपुलावरील जॉईंट्सचं काम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी दररोज रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत एक मार्गिका बंद राहणार आहे. २८ फेब्रुवारी ते २७ मार्च अशा एका महिन्याच्या कालावधीसाठी ही मार्गिका बंद राहील. त्यामुळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे जाणाऱ्या मार्गावरील दोनपैकी एक मार्गिका या काळात बंद असेल.
advertisement
वाहतूक कशी असेल?
रात्रीच्या वेळी वाहतूक कमी असल्याने महापालिकेने ही वेळ निवडली आहे. पुलावरील एका मार्गिकेवर काम सुरू असताना दुसरी मार्गिका वाहतुकीसाठी खुली ठेवली जाईल, जेणेकरून वाहनचालकांची गैरसोय टाळता येईल. महत्त्वाचे म्हणजे, दररोज पहाटे ५ वाजल्यानंतर काम थांबवून संबंधित मार्गिका पुन्हा सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुली केली जाणार आहे.
दुरुस्तीचे कारण
यापूर्वी महापालिकेने पुलावरील १४ बेअरिंग बदलण्याचे काम पूर्ण केले आहे. मात्र, दिवसा असलेल्या प्रचंड वाहतुकीमुळे पुलाच्या सांध्यांचे काम प्रलंबित होते. आता महिनाभर चालणाऱ्या या प्रक्रियेमुळे पुलाची स्थिती अधिक मजबूत होईल, असे विशेष प्रकल्प विभागाचे प्रमुख दिनकर गोजारे यांनी स्पष्ट केले.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: पुणेकरांनो लक्ष द्या! पुणे विद्यापीठाकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग 'या' वेळेत महिनाभरासाठी बंद, काय आहे कारण?
Next Article
advertisement
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार; मालकाचे खळबळजनक विधान, म्हणाला- हळूहळू काढण्यापेक्षा मी एकदाच...
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार
  • सर्वात भयानक काळ सुरू

  • 'क्रूर' निर्णयाने कर्मचारी सुन्न

  • 4,000 कुटुंबांची चूल विझली

View All
advertisement