Pune Airport: पुणेकरांनो आज एअरपोर्टवर जात असाल तर हे वाचाच; नाहीतर फ्लाइट होईल मिस!विमानतळ संचालकांच्या महत्त्वाच्या सूचना

Last Updated:

सायकल शर्यतीचा मार्ग आणि त्यावरील गर्दीमुळे विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

विमान प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी (फाईल फोटो)
विमान प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी (फाईल फोटो)
पुणे : पुणे शहरात आयोजित 'पुणे ग्रँड टूर' या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमुळे शुक्रवारी (२३ जानेवारी) मोठ्या प्रमाणावर वाहतूक बदल करण्यात आले आहेत. या बदलांचा फटका विमान प्रवाशांना बसू शकतो, हे लक्षात घेऊन पुणे विमानतळ प्रशासनाने प्रवाशांसाठी महत्त्वाची नियमावली (ॲडव्हायझरी) जारी केली आहे.
विमानतळ प्रशासनाचे आवाहन: शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहरातील अनेक प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. सायकल शर्यतीचा मार्ग आणि त्यावरील गर्दीमुळे विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांचे विमान चुकू नये, यासाठी त्यांना नेहमीपेक्षा किमान १ ते २ तास आधी घरून निघण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
पर्यायी मार्गांचा वापर करा: शहरातील मुख्य रस्ते सायकलिंगसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांनी बाहेर पडण्यापूर्वी पोलिसांनी सुचवलेल्या पर्यायी मार्गांची आणि बंद रस्त्यांची सविस्तर माहिती घ्यावी. ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी प्रवाशांनी गुगल मॅप्स किंवा पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे विमानतळ संचालक कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
advertisement
विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर विशेषतः विद्यापीठ चौक, बाणेर रस्ता आणि संगमवाडी परिसरातील वाहतुकीवर लक्ष ठेवून प्रवासाचे नियोजन करणे प्रवाशांच्या हिताचे ठरेल.
स्पर्धेचा मार्ग (Route):
राधा चौक (बाणेर) → पूनम बेकरी (सूस रस्ता) → पाषाण सर्कल → पुणे विद्यापीठ चौक → राजीव गांधी पूल → सेनापती बापट जंक्शन → सेनापती बापट रस्ता (बालभारती) → पत्रकार भवन → लॉ कॉलेज रस्ता → शेलार मामा चौक → कर्वे पुतळा चौक → वनाज → पौड रस्ता → नळस्टॉप → म्हात्रे पूल → सेनादत्त पोलीस चौकी → टिळक चौक → पुरम चौक → अप्पा बळवंत चौक → राष्ट्रभूषण चौक → सावरकर चौक → महाराष्ट्र मित्र मंडळ चौक → सेवन लव्हज चौक → पॉवर हाऊस चौक → डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक → इंदिरा गांधी चौक → अर्जुन रस्ता → घोरपडी जंक्शन → बोलहाई चौक → लाल महाल चौक → स. गो. बर्वे चौक → नरवीर तानाजी वाडी चौक → गरवारे चौक → बालगंधर्व चौक.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Airport: पुणेकरांनो आज एअरपोर्टवर जात असाल तर हे वाचाच; नाहीतर फ्लाइट होईल मिस!विमानतळ संचालकांच्या महत्त्वाच्या सूचना
Next Article
advertisement
Mumbai Mayor Reservation: अ, आ, इ, ई... आणि मुंबईचा गेम झाला! महापौर पदाच्या शर्यतीतून ओबीसी प्रवर्ग बाहेर पडण्याचं खरं कारण
अ, आ, इ, ई... अन् मुंबईचा गेम झाला! महापौर पदाच्या शर्यतीतून ओबीसी बाहेर का?
  • मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

  • महापौर आरक्षण सोडतीवर शिवसेना ठाकरे गटाने आक्षेप घेतला होता.

  • ओबीसींसाठी मुंबईचं महापौर पदाचं आरक्षण का लागू झालं नाही, असा प्रश्न उपस्थित करण

View All
advertisement