'हेराफेरी' करणे येवले अमृततुल्यला भोवलं, 50 लाखांचा केलं नुकसान; प्रकरणामुळे मार्केटमध्ये खळबळ

Last Updated:

शेमारु कंपनीचे 50 लाख रुपयांचे नुकसान झालं, असा दावा शेमारू कंपनीने तक्रारीत केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

yewale amruttulya
yewale amruttulya
पुणे : 'येवले अमृततुल्य' हा विषय चहाप्रेमींमध्ये पुणेकरांसाठी चर्चेचा विषय आहे. 'येवले चहा, एकदा पिऊन तर पाहा' असं या अमृततुल्यचं आवाहन आहे. चहाचा हा ब्रँड फक्त पुण्यातच नाही तर अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मात्र पुण्याच्या येवले अमृततुल्यच्या अडचणीत वाढ झाली असून शेमारू या एन्टरटेन्मेंट कंपनीने तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल अमृततुल्य कंपनीच्या संचालकाविरोधात गुन्हा दखल झाला आहे. सोशल मीडिया अकाऊंटवरून परवानगी न घेता एका चित्रपटातील क्लिप प्रसारित केल्याचा आरोप शेमारू कंपनीकडून तक्रारीत करण्यात आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, ‘हेराफेरी’, ‘वेलकम’, ‘गोलमाल’ यांसारख्या अनेक चित्रपटांचे स्वामित्व हक्क शेमारू कंपनीकडे आहे. कोणतीही परवानगी न घेता या चित्रपटातील काही भागाचे मिम तयार करत येवले अमृतुल्यने आपल्या चहाच्या प्रसिद्धीसाठी वापरल्याचा आरोप आहे. येवले कंपनीने कोणतीही परवानगी न घेता या चित्रपटातील काही भाग सोशल मीडियावर टाकले. कंपनीच्या तक्रारीवरून कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
advertisement

शेमारु कंपनीचे 50 लाख रुपयांचे नुकसान 

शेमारू कंपनीच्या ही बाब लक्षात आल्यानंतर शेमारूने येवले कंपनीला जानेवारी महिन्यात नोटीस पाठवून संबंधित चित्रपटांचे स्वामित्व हक्क आपल्याकडे असून मिम तातडीने हटवा, असं सांगितले होते. परंतु तरीही येवले कंपनीने मिम हटवले नाहीत. त्यामुळे शेमारु कंपनीचे 50 लाख रुपयांचे नुकसान झालं, असा दावा शेमारू कंपनीने तक्रारीत केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
advertisement

विविध कलमांनुसार गुन्हा दाखल

गोलमाल आणि फिर हेराफेरी या चित्रपटांतील काही भाग रिल्स आणि पोस्टर पोस्ट करून सुमारे 50 लाख रुपयांची कमाई केल्याचा शेमारू कंपनीकडून आरोप करण्यात आला आहे. शेमारू कंपनीच्या तक्रारीनंतर एमआयडीसी पोलिसांकडून कंपनीसह नवनाथ येवले, मंगेश येवले, गणेश येवले, नीलेश येवले व तेजस येवले यांच्याविरुद्ध प्रतिलिपी अधिकार अधिनियमासह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
'हेराफेरी' करणे येवले अमृततुल्यला भोवलं, 50 लाखांचा केलं नुकसान; प्रकरणामुळे मार्केटमध्ये खळबळ
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement