Pune Crime : आयुषचा मृतदेह पाहतोय वडिलांची वाट, 72 तासांच्या वेटिंगनंतर गणेश कोमकर तुरूंगाबाहेर, ससूनमध्ये हालचालींना वेग!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Ganesh Komkar get parole from jail : आयुष कोमकरचे वडील आणि वनराज आंदेकर हत्येचा आरोपी गणेश कोमकर याला पॅरोल मिळाला असून तो नागपूरवरून पुण्याला विमानाने रवाना झाला आहे.
Pune Crime News : गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील नाना पेठेत गॅंगवाराचा भडका उडाला होता, त्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला आंदेकर टोळीने आयुष कोमकरचा खून करूनच घेतला आहे. आंदेकर टोळीने पिस्तुलातून 11 गोळ्या झाडल्या. त्यातील 3 गोळ्या लागून आयुषचा मृत्यू झाला आहे. घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालंय. या प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर याच्यासह अकरा जणांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अशातच आता नागपूरमधून मोठी माहिती समोर आली आहे.
गणेश कोमकरला पॅरोल मिळाला
वनराज आंदेकरच्या हत्येच्या आरोपाखाली असलेल्या तुरूंगात असलेल्या गणेश कोमकर सध्या नागपूरच्या तुरूंगात आहे. मुलाच्या हत्येची माहिती मिळताच गणेश कोमकर याला धक्का बसला होता. अशातच आता गणेश कोमकर याला पॅरोल मिळाला असून तो नागपूरवरून पुण्याला विमानाने रवाना झाला आहे. त्यामुळे आता पुण्यातील गँगवॉर आणखी पेटणार की काय? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. तर दुसरीकडे आयुषच्या काका आणि काकीला मात्र पॅरोल मिळू शकला नाही. आयुष कोमकरचा मृतदेह सध्या ससून रुग्णालयात आहे. गणेश कोमकर आल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार होतील.
advertisement
आयुष कोमकरवर आज अंत्यसंस्कार
माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष गणेश कोमकर याच्यावर गोळीबार करून निर्घृण खून केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्यासह 13 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यामध्ये माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकरसह आणखी एका महिलेचा समावेश आहे. या प्रकरणी यश पाटील आणि अमित पाटोळे यांना अटक केली आहे.दोन दिवस गणेशविसर्जन असल्यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आयुष कोमकर याचेयावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
advertisement
आई कल्याणी कोमकरची फिर्याद
दरम्यान, आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडूअण्णा आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर, पुतण्या शिवम आंदेकर, नातू स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, वृंदावनी वाडेकर, लक्ष्मी आंदेकर, अमन युसुफ पठाण उर्फ खान, यश सिद्धेश्वर पाटील, (डोके तालमीजवळ, नाना पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत आयुष कोमकर याची आई कल्याणी गणेश कोमकर (लक्ष्मी कॉम्प्लेक्स, हमाल तालमीजवळ, नाना पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 08, 2025 12:45 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : आयुषचा मृतदेह पाहतोय वडिलांची वाट, 72 तासांच्या वेटिंगनंतर गणेश कोमकर तुरूंगाबाहेर, ससूनमध्ये हालचालींना वेग!