Pune : पुण्यात 'मोक्का'तील फरार आरोपीने स्वत:ला संपवलं! प्रशांत जगतापांना लिहिलं होतं पत्र, हडपसरच्या टिपू पठाण टोळीचं कनेक्शन समोर!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune Crime Sadik Kapur Ends Life : पुण्यातील सादिक कपूर यांनी आत्महत्येपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) माजी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना लिहिलेलं एक पत्र समोर आलं आहे.
Pune Crime News : पुण्यातील एका व्यक्तीने अजित पवार गटाच्या उमेदवाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना पुण्यातून समोर आली होती. अशातच या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून आता एक नवीन वळण मिळालं आहे. सादिक कपूर असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव असून तो मकोकामधील फरार आरोपी होता, अशी माहिती समोर आली आहे. फारुख इनामदार हा सतत त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आला होता.
प्रशांत जगताप यांना लिहिलेलं एक पत्र
सादिक कपूर यांनी आत्महत्येपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) माजी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना लिहिलेलं एक पत्र समोर आलं आहे. हे पत्र 20 डिसेंबर रोजी लिहिण्यात आलं होतं, ज्यामध्ये त्यांनी आपल्या जीवाला असलेला धोका आणि राजकीय दबावाबाबत गंभीर इशारे दिले होते.
'टिपू पठाण' टोळीचा म्होरक्या
advertisement
या पत्रात सादिक कपूर यांनी थेट आरोप केला होता की, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार फारुख इनामदार (शेख) हा 'टिपू पठाण' टोळीचा म्होरक्या आहेत. फारुख इनामदार यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे लक्ष वेधताना सादिक यांनी तक्रार केली होती की, त्यांच्याकडून प्रचंड त्रास दिला जात आहे. पक्षातील वरिष्ठांनी वेळीच हस्तक्षेप करून फारुख इनामदार यांना रोखले पाहिजे, अशी कळकळीची विनंतीही त्यांनी या पत्राद्वारे केली होती.
advertisement
30 पानांची सुसाईड नोट
दुर्दैवाने, या पत्रावर वेळीच कारवाई न झाल्याने किंवा परिस्थिती न सुधारल्याने सादिक कपूर यांनी काल टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या 30 पानांच्या सुसाईड नोटमध्ये आणि हातावर लिहिलेल्या मजकुरात पुन्हा एकदा फारुख इनामदार यांचे नाव घेतल्याने आता पोलिसांवरील दबावात वाढ झाली आहे. या पत्रामुळे सादिक आणि फारुख यांच्यातील वाद केवळ जमिनीपुरता मर्यादित नसून त्याला गुन्हेगारी आणि राजकीय पदरही असल्याचे स्पष्ट होत आहे.
advertisement
राजकीय वर्तुळात मोठी खळबळ
दरम्यान, पुणे पोलीस आता या जुन्या पत्राचा आणि सुसाईड नोटचा आधार घेऊन तपासाची चक्रे फिरवत आहेत. निवडणुकांच्या धामधुमीत एका उमेदवाराचे नाव अशा प्रकारे गुन्हेगारी टोळीशी जोडले गेल्यामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सादिक कपूर हा हडपसर परिसरातील कुख्यात गुंड टिपू पठाण याच्यासोबतच्या 'मोक्का' गुन्ह्यात पाहिजे होता.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 04, 2026 12:16 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune : पुण्यात 'मोक्का'तील फरार आरोपीने स्वत:ला संपवलं! प्रशांत जगतापांना लिहिलं होतं पत्र, हडपसरच्या टिपू पठाण टोळीचं कनेक्शन समोर!








