Cyber Crime: धक्कादायक! तो व्हिडिओ कॉल उचलणं पडलं महागात, पुण्यातील महिलेनं मिनिटात गमावले 4 कोटी 82 लाख रूपये
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुणे शहरातील कोंढवा परिसरात एका महिलेला 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली तब्बल ४ कोटी ८२ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पुणे : पुणे शहरातील कोंढवा परिसरात एका महिलेला 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली तब्बल ४ कोटी ८२ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सायबर चोरट्यांनी मनी लाँड्रिंगचा बनाव रचून ही मोठी फसवणूक केली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१८ डिसेंबर रोजी सायबर चोरट्यांनी फिर्यादी महिलेला पोलीस अधिकारी असल्याचे भासवून फोन केला. "तुमच्या आधार कार्डचा गैरवापर करून विविध राज्यांत बँक खाती उघडली आहेत आणि त्यातून मनी लाँड्रिंगचे व्यवहार झाले आहेत," अशी भीती त्यांना घालण्यात आली. महिलेला तासनतास व्हिडिओ कॉलवर गुंतवून तिला 'डिजिटल अरेस्ट' केल्याचा बनाव रचण्यात आला. अटक टाळायची असेल, तर तपासासाठी पैसे जमा करावे लागतील, असे सांगून चोरट्यांनी महिलेकडून वेळोवेळी एकूण ४ कोटी ८२ लाख १४ हजार रुपये विविध बँक खात्यांत वर्ग करून घेतले.
advertisement
इतकी मोठी रक्कम दिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले आणि त्यांनी १९ जानेवारी रोजी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सध्या पोलीस तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.
सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. "कोणतीही तपास यंत्रणा किंवा पोलीस फोनवर किंवा व्हिडिओ कॉलवर कोणालाही अटक (डिजिटल अरेस्ट) करत नाहीत. पैशांची मागणी केल्यास तो सायबर गुन्हा समजावा आणि तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा," असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 22, 2026 10:31 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Cyber Crime: धक्कादायक! तो व्हिडिओ कॉल उचलणं पडलं महागात, पुण्यातील महिलेनं मिनिटात गमावले 4 कोटी 82 लाख रूपये









