पुणेकरांनो सावधान! फसवणुकीचा जीवघेणा खेळ; लाखोंची बनावट औषधं जप्त, बिहार ते सिक्कीम कनेक्शन
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
शहरातील मेडिकल दुकानांतून २ लाख ७५ हजार रुपयांचा बनावट औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पुणे शहरातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पुणे: सिक्कीममधील एका नामांकित फार्मास्युटिकल कंपनीच्या नावाचा गैरवापर करून बनावट औषधांचे उत्पादन आणि वितरण करणाऱ्या टोळीवर कारवाई करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ही मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी पुण्यातील औषध विक्रेत्यांसह एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील मेडिकल दुकानांतून २ लाख ७५ हजार रुपयांचा बनावट औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पुणे शहरातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणी अक्षय हसमुख पुनिया, अमृत बस्तीमल जैन, मनिष अमृत जैन, रोहित पोपट नावडकर, देवेंद्र यादव, उमंग अभय रस्तोगी, महेश गर्ग, आणि सोनी महिवाल या आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त गिरीश हुकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिक्कीम येथील टेरेंट फार्मास्युटिकल्स या कंपनीच्या ट्रिप्सिन (Trypsin) नावाच्या औषधाचे बनावट उत्पादन पुणे शहरात विक्रीसाठी येत असल्याची गोपनीय माहिती एफडीएला मिळाली होती.
advertisement
१६ ऑक्टोबर २०२५ रोजी औषध निरीक्षकांनी सदाशिव पेठेतील 'अक्षय फार्मा' या दुकानावर छापा टाकून औषधाच्या साठ्यातून चाचणीसाठी नमुना घेतला. तपासणीसाठी पाठवलेल्या नमुन्याचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर, सिक्कीमच्या टेरेंट फार्मास्युटिकल्स कंपनीने लेखी पत्राद्वारे कळवलं की, हे औषध त्यांनी उत्पादित केलेलं नाही आणि ते त्यांचं नाही.
advertisement
बिहारपर्यंत धागेदोरे: अक्षय फार्माच्या मालकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्याने हे औषध इतर दोन व्यक्तींकडून घेतलं होतं. तपासाचे धागेदोरे बिहारमधील गोपालगंज येथील 'महिवाल मेडिको' या पेढीपर्यंत पोहोचले. मात्र, स्थानिक ड्रग्ज कंट्रोलरने ही पेढी बंद असून, त्यांचा परवाना २० नोव्हेंबर २०२४ रोजीच मुदतबाह्य झाल्याची माहिती दिली.
मोठा साठा जप्त
view commentsएफडीएला मिळालेल्या या संपूर्ण माहितीच्या आधारावर, प्रशासनाने पुणे शहरातील विविध ठिकाणांहून २ लाख ७५ हजार रुपये किमतीचा बोगस औषधांचा साठा जप्त केला आहे. सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असलेल्या या फसवणुकीप्रकरणी विश्रामबाग पोलीस पुढील तपास करत आहेत
Location :
Pune,Maharashtra
First Published :
December 13, 2025 11:23 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांनो सावधान! फसवणुकीचा जीवघेणा खेळ; लाखोंची बनावट औषधं जप्त, बिहार ते सिक्कीम कनेक्शन









